विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा भाग्यश्री ताई यांनी केले स्वागत
सिरोंचा:कॅबिनेट मंत्री यांच्या विकास कामांचा धडाका आणि माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांचा जनसंपर्क बघून अहेरी विधानसभेतील विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या प्रमाणात इंकमिंग सुरु आहे.नुकतेच सिरोंचा तालुक्यातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी भाग्यश्री ताई आत्राम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केले.
धर्मराव बाबा आत्राम यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यावर गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणण्यात त्यांना यश आला आहे.विशेष करून अहेरी विधानसभा क्षेत्रातील पाचही तालुक्यात त्यांचा विशेष लक्ष असून विकास कामांचा धडाकाच लावला आहे.सोबत या भागातील विविध समस्या मार्गी लावण्यासाठी भाग्यश्री ताई आत्राम सतत धडपडत असून त्यांनी अहेरी विधानसभेवर चांगलीच पकड तयार केली आहे.नुकतेच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत त्याचा प्रत्यय सुद्धा आला.पहिल्यांदाच त्यांच्या नेतृत्वात ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यात आली त्यात त्यांना चांगलं यश सुद्धा मिळालं.
सध्या अहेरी विधानसभेत भाग्यश्री ताई यांची जोरदार चर्चा सुरू असून त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सिरोंचा तालुक्यातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.यावेळी ताईंनी पक्षाचा दुपट्टा गळ्यात टाकत त्यांचे स्वागत केले.यावेळी राकॉचे सिरोंचा तालुका अध्यक्ष मधुकर कोल्लूरी तसेच आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.






