बामणी पोलिसांच्या वतीने दिवाळी निमित्त गरीब व गरजू महिलांना साडी वाटप

269

 

रवि बारसागांडी गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

बामणी पोलिसांच्या कार्याचे परिसरात केले जात आहे कौतुक

रवी बारसांगडी तालुका प्रतिनिधी सिरोंचा

सिरोंचा : आदिवासी बहुल भागात असलेल्या सिरोंचा तालुक्यातील बामणी पोलिसांच्या वतीने टेकडातल्ला ,मोकेला, नेमडा येथील गरीब व गरजू महिलांना दिवाळी निमित्त साडी, फराळ व मिठाईचे वाटप करण्यात आले. पोलिस स्टेशन बामणीचे पोलिस उपनिरीक्षक मदन मस्के हे दरवर्षी आदिवासी भागातील नागरिकां समवेत विविध उपक्रम राबवुन दिवाळी साजरी करतात, यावर्षीही पोलिस उपनिरीक्षक मदन मस्के यांनी टेकडातल्ला, मोकेला, नेमडा या गावातील गरीब व गरजू महिलांना साडी, मिठाई, फराळाचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी पोलिस उपनिरीक्षक मदन मस्के यांच्यासह उपनिरीक्षक दांडे, उपनिरीक्षक पांडे, व जाफराबाद ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व गावातील महिला, पुरुष उपस्थित होते.
पोलिस उपनिरीक्षक मदन मस्के यांच्या या कार्याचे बामणी परिसरात कौतुक केले आहे