सिरोंचा.अहेरी विधानसभा क्षेत्र अंतर्गत
येणाऱ्या शेवटच्या टोक म्हणून ओळखले जाणाऱ्या सिरोंचा तालुक्यात गेल्या ३-४ वर्षा पासून महावितरण संबंधित अनेकानेक या भागातील शेतकरी अडीअडचणी विविध समस्येच्या समना करावा लगत असून त्याचा आता पर्यंत कोणत्याही प्रकारच्या न्याय निवारण झालेले नाही आहेत. या भागात महावितरण विध्युत संबंधित शेतकऱ्यांना शेतातील पीक बाबत ऐनवेळी महावितरण विध्युत पुरवठा लोडशेडिंग करत बंद करतात बिल भरा अशी अटी व शर्ती लवतात, या भागात शेतकऱ्यांना शेतकरी महावितरण विभागाकडून विध्युत जोडणी घेतली असता त्यांना दर तीन महिन्यात नियमित येणाऱ्या विज बील वाढीव टाकतात या भागात शेतात कोठेही AG मीटर लावली नसते फक्त सरासरी रिडींग ने शेतकऱ्यावर विज बिल सावकारी पध्दतीने आकारली जात आहे. शेतात एका ट्रान्सफॉर्मर वर विध्युत जोडणी घेतलेली ग्राहक फार कमी असतात, बाकी जोडणी नसलेल्या ग्राहकांची संख्या जास्त असताता विध्युत वापरली रिडींग आकाड्याची सरकारी जोडणी ग्राहकावर आकारत आहे. शेतात ट्रान्सफॉर्मर जाळत असाल तर शेतकरी वर्गाच एकञि येऊन पैसे गोळा करून ट्रान्सफॉर्मर आणावी लागत आहे. मग शासन शेतकऱ्यासाठी कोणती काम करत आहे?
शेतकरी हा भारत देशाच्या पाठीचा कणा म्हणून ओळखले जाणारा माणूस आज शेती करण्यासाठी रडत आहे अशी परिस्थिती या भागात निर्माण झालेल्या आहे, अहो या भागात कोणतेही औद्योगिक करण नाही आदिवासी भाग म्हणून ओळखले जाणारा भागात कोणती लोडशेडिंग राहतात कोणती वाढीव विज बिल, कोणती दुर्लक्ष?
सन २०२० पाहिले सरकार कोणती शेतपंप विज बिल आकारली? त्यानंतर कारोना महामारीच्या संकाटात पण शेतकऱ्यावर सरकार, महावितरण विभाग द्याया दाखविले नाही. कृषीपंप धोरण २०२० म्हणून आजीचे सध्याचे विज बिल भरा ५०टक्के सुट देणार सन्मान करणार अशी गावागावात मोहीम राबवली होती पुर्व सुचना न देत थेट डीपी बंद करणे या विषय पाहून शेतकरी आपल्या घरात असलेल्या काही दागिने विकून विज बिल भरले होते माञ ही तेच सावकर पध्दतीने वासूली सुरूच लोडशेडिंग सुरूच मग या भागातील समस्या केव्हाही निपटणार नाही का? राज्य सरकार शेतकऱ्यावर लक्ष्य साधून या भागातील लोडशेडिंग असो वाढीव सरासरी विजबिल पुर्ण पणे माफ करता येत नाही का? करावी राज्य सरकार या क्षेत्र अंतर्गत बलाढ्य अशी सुरजागड प्रकल्पाने राज्य सरकारच्या तिजोरीत कोट्यावधी पैसे भरत आहे माञ या भागातील शेतकरी बांधव उपाशी मरत आहे, रस्त्यावर येत असून आपले अर्थनाद सांगण्याचा पाळी आली आहे. स्थानिक आमदार साहेब, स्थानिक खासदार साहेब या कडे लक्ष केंद्रित बील माफ करण्यात यावी. यावेळी मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.