स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांची धडाकेबाज कारवाई 

195

पोलीस अभिलेखावरील गुन्हेगाराकडून ३ गावठी पिस्टल, २ गावठी कट्टे, ७८ जिवंत काडतुसे, ३७० वापरलेल्या काडतुसाच्या रिकाम्या पुंगळ्या, २ तलवारी, वन्यजीव प्राण्याची शिंगे, वाघाचे नख असा ६,२०,३०० /- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त.

श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी सातारा जिल्हयातील बेकायदेशिर शस्त्र बाळगणाऱ्या इसमांच्यावर कारवाई करण्याचे आदेश श्री अरुण देवकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांना दिल्या आहेत. त्याप्रमाणे अरुण देवकर पोलीस निरीक्षक यांनी रविंद्र भोरे सहायक पोलीस निरीक्षक व पतंग पाटील, अमित पाटील पोलीस उपनिरीक्षक यांच्या अधिपत्त्याखाली एक विशेष तपास पथक तयार केलेले आहे.

दिनांक २९/१०/२०२३ रोजी पोलीस निरीक्षक श्री अरुण देवकर यांना, बावधन नाका वाई येथील पोलीस अभिलेखावरील आरोपी अविनाश मोहन पिसाळ रा. बावधन नाका ता. वाई जि. सातारा याच्याकडे बेकायदेशिर देशी बनावटीचे पिस्टल आहे तसेच त्यास शिकारीचा छंद असून त्याच्याकडे वन्यजीव प्राण्यांचे अवयवही आहेत अशी माहिती मिळाल्याने रविंद्र भोरे सपोनि व त्यांच्या पथकास बातमीच्या अनुषंगाने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या त्या अनुषंगाने सपोनि रविंद्र भोरे व त्यांचे पथकाने वनविभाग वाई येथील अधिकारी यांना सोबत घेवून मिळालेल्या बातमीचे ठिकाणी छापा टाकुन पोलीस अभिलेखावरील नमुद गुन्हेगाराकडून ३ गावठी पिस्टल, २ गावठी कट्टे, ७८ जिवंत काडतुसे, ३७० वापरलेल्या काडतुसाच्या रिकाम्या पुंगळया, २ तलवारी, वन्यजीव प्राण्याची शिंगे, वाघाचे नख असा ६,२०,३००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन त्याचे विरुद्ध वाई पोलीस ठाण्यास शस्त्र अधिनियम व वन्यजीव सरंक्षण अधिनियमातर्गत गु.र.नं. ७६९ / २०२३ शस्त्र अधिनियम कलम ३,४,२५ सह वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ९,३९,५०,५१ अन्वये नोंद करण्यात आला आहे.

सदर कारवाईमध्ये श्री समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली अरुण देवकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, रविंद्र भोरे, पोउनि पतंग पाटील, विश्वास शिंगाडे, अमित पाटील, मदन फाळके पोलीस अंमलदार अतिश घाडगे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, लक्ष्मण जगधने, लैलेश फडतरे, सचिन साळुंखे, प्रविण फडतरे, सनी आवटे, अमित माने, अविनाश चव्हाण, गणेश कापरे, अमित सपकाळ, प्रमोद सावंत, स्वप्नील कुंभार, ओमकार यादव, विक्रम पिसाळ, मोहन पवार, अरुण पाटील, विशाल पवार, प्रविण पवार, रोहित निकम, सचिन ससाणे, पृथ्वीराज जाधव, मयूर देशमुख, वैभव सावंत, संकेत निकम, शिवाजी गुरव, संभाजी साळुंखे, पंकज बेसके, अमृत कर्पे सायबर विभागाचे अमित झेंडे, अजय जाधव यांनी सहभाग घेतला असुन कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले आहे.