जि.प.माजी अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांच्याकडून साऊंड सिस्टमसह बॉक्सचे वितरण

147

 

उमानूर येथील महिलांनी मानले अजयभाऊ कंकडालवार यांचे आभार

अहेरी : तालुक्यातील उमानूर येथील नवरात्री -बतकम्मा तथा शारदा उत्सव मोठ्या उत्सहात साजरा करतात.”या”उत्सहात महिला वर्ग मोठ्या संख्येने सहभागी घेऊन DJ बॉक्स लावून सामूहिक नूत्य करतात.उमानूर येथील महिलांना बतकम्मा उत्सव साजरा करण्यासाठी DJ सिस्टम नसल्याने नवरात्री – बतकम्मा दिवशी अडचण भासत होती.”ही”बाब उमानूर कार्यकर्त्यांन कडून आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना माहिती देताच तात्काळ बतकम्मा उत्सव वेळी उमानूर महिलांना साऊंड सिस्टमसह बॅक्सचे खरेदी करून दिले.त्यावेळी उमानूर महिलांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण दिसून आले.त्यावेळी अजयभाऊंची समस्त नागरिक – महिला वर्गांनी आभार मानले.

यावेळी उपस्थित माजी जि.प.सदस्य अजय नैताम,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,राकेश सडमेक,शामराव गावडे,शंकर गावडे,महेश येलकुची,विलास सालपाला,लक्ष्मीस्वामी आटेला,नारायण गंधार्ला,राजन्ना जेल्लेवार,मनोज पानेम,मुत्ताय्या,मनोज येदासुला,प्रमोद गोडसेलवारसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.