आशा सेविकांच्या बेमुदत संप आंदोलनाला (शरद पवार) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष – सागर मूलकला यांचेकडून जाहीर पाठिंबा

80

 

सिरोंचा :- आरोग्य सेवेत दिसत/रात्र काम करणाऱ्या आशा सेविका/गटप्रवर्तकांची विविध मागणी घेऊन राज्य व्यापी बेमुदत संपवर सुरुवात केली आहे,
सिरोंचा तालुक्यातील आशा सेविका/आशा गटप्रवर्तकांची गेल्या 2005 पासून आरोग्य सेवेत कार्यरत आहेत,
आशा सेविका/गटप्रवर्तकांची शासनाने कंत्राटी कामगार ठेवून त्यांचे आरोग्य सेवेत काम करून घेत आहेत,
आशा सेविका/गटप्रवर्तकांची शासकीय कर्मचाऱ्यांची दर्जा देण्यात यावी, आणि आशा सेविका/गटप्रवर्तकांना 2008 पासून मानधन वेतनात वाढ केली नाही,किमान मानधन वेतन दरमहा १८००० रु करण्यात यावे,
आशा सेविका/गटप्रवर्तकांना ड्युटीवर असताना अपघाती किंवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास वारसदारांना तात्काळ दाह लाख रुपयांचे आर्थिक मदत देण्यात यावे,गटप्रवर्तकांना आशा सुपरवायझर असे नावही देण्यात यावे, असे विविध मागणी घेऊन सिरोंचा तालुक्यातील आशा सेविका/गटप्रवर्तकांनी आज १८ अक्टोबर पासून तहसील कार्यालयात निवेदन देऊन बेमुदत संप आंदोलनाला सुरुवात केली आहे,
आशा सेविका/गटप्रवर्तकांची बेमुदत संप आंदोलनाला (शरद पवार) सिरोंचा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे तालुका उपाध्यक्ष – सागर मूलकला यांचेकडून जाहीर पाठिंबा देऊन राज्य सरकारावर तीव्र रोष व्यक्त केली आहे,
राज्य सरकारने आशा सेविका/आशा गटप्रवर्तकांना मोठी अन्याय करत आहे,
तात्काळ आरोग्य सेवेत कार्यरत असलेल्या आशा सेविका/आशा गटप्रवर्तकांची विविध मागणी पूर्ण करण्यात यावे अन्यथा येत्या दिवसात तीव्र आंदोलन करण्यात येईल असे इशारा देखील देण्यात आली आहे,
त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष – सागर मूलकला, कार्यकर्ते – विनोद नायडू, सलमान शेख, राजकुमार मूलकला,गणेश सॅड्र यांच्या सह तालुक्यातील आशा सेविकांची मोठ्या संख्येने उपस्थित होते,

तालुका प्रतिनीधी सिरोंचा
राजमोगली एम दुर्गम