तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम यांच्याकडून दिकोंडा कुटुंबाला आर्थिक मदत

118

 

सिरोंचा – तालुक्यातील ग्राम पंचायत गरकापेठा येथील आविसं कार्यकर्ता राजन्ना दिकोंडा यांच्या आईच्या दीर्घआजाराने दुःखद निधन झाला.

*आविसं सिरोंचा तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम यांच्या आदेशानुसार ग्राम पंचायत गरकापेठाचे सरपंच सुरज गावडे यांनी आविस कार्यकर्त्यांसमवेत स्वर्गवास यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांना भेटून कुटुंबाची सांत्वन करून तेरवी कार्यक्रमाला आदिवासी विध्यार्थी संघटनेचे सिरोंचा तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम यांच्या कडून राजन्ना दिकोंडा यांना तेरवी कार्यक्रमासाठी आर्थिक मदत देऊन दिकोंडा कुटुंबियांचे सांत्वन केले आहे.*

*यावेळी सरपंच सुरज गावडे, सुधाकर दुर्गम, राजन्ना दुर्गम, महेश कावरे, समय्या कोंडागोर्ला, रवेंद्र रामटेंकी, शंकर दुर्गम, सत्यम कुम्मरी व गावातील आविसंचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदी – उपस्थित होते.*

तालुका प्रतिनीधी सिरोंचा
राजमोगली एम दुर्गम