अहेरी:सुरक्षा बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्था राजारामच्या वतीने 2 ऑक्टोबरला एका प्रेम प्रकरणात अडकलेल्या आंतरजातीय जोडप्याचा विवाह लावून देण्यात आला. सदर जोडपे प्रेम प्रकरणात अडकलेले होते.मुलीची परिस्थिती अत्यंत बिकट व गरीबीची असल्यामुळे, तसेच मुलीला वडील नसून आईची लग्न लावून देण्याची आर्थिक परिस्थिती नव्हती. सदर बाब संस्थेचे अध्यक्ष ॲड. एच. के. आकदर यांना कळताच मुला,मुलीला व त्यांच्या नातेवाईकांना बोलावून संस्थेमार्फत आंतरजातीय विवाह लावून देण्यात आला व वर वधूला संस्थे कडून प्रमाणपत्र देण्यात आले . यावेळेस वर आणि वधू कडील नातेवाईक, गावातील नागरिक व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.