माजी जि प अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांनी घेतले दुर्गा देवीचे दर्शन

51

मुलचेरा तालुक्यात दुर्गा उत्सव उत्साहाने साजरा

मुलचेरा:-तालुक्यातील दुर्गा उत्सवाला 34 वर्षांची परंपरा लाभली असून कोरोनावरील निर्बंध उठविल्यानंतर यंदा हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे.आज 4 ऑक्टोबर रोजी माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्रीताई आत्राम यांनी मुलचेरा तालुक्यातील विविध गावांत भेटी देऊन दुर्गा देवीचे दर्शन घेतले.मुलचेरा तालुक्यात पुनर्वसित बंगाली बांधव मोठ्या संख्येने असून याठिकाणी प्रत्येक सण मोठ्या उत्साहाने साजरा केले जातात.यामध्ये दुर्गा उत्सव हा सर्वात मोठा सण मानला जातो.सष्टमी ते दशमी पर्यंत म्हणजे केवळ 5 दिवसाचा हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.यादरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन सर्वांना मंत्रमुग्ध करण्याचा काम मंडळातर्फे केले जाते.सोबतच दांडिया व गरबाचे आयोजन केले जात आहे.त्यामुळे विविध गावात नागरिकांची एकच गर्दी

पाहायला मिळत आहे.पाच दिवसांच्या विविध कार्यक्रमात सर्वच लोकप्रतिनिधी वेळात वेळ काढून आपआपली उपस्थिती दर्शवितात.माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्रीताई आत्राम यांनी हरीनगर,सुंदर नगर,विवेकानंदपूर,देशबंधुग्राम आदी गावांतील दुर्गा उत्सवात सहभागी होऊन देवीचे दर्शन घेतले.ताईंचा आगमन होताच विविध गावांतील दुर्गा उत्सव मंडळातर्फे पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.