मुदती संपणा-या ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर

41

वर्धा, : राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशनुसार  वर्धा जिल्ह्यातील माहे ऑक्टोंबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणा-या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी संगणकीय प्रणालीव्दारे मतदार यादी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यासाठी मतदार यादीचे प्रभागनिहाय विभाजन करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. 
दि.31 मे 2022 रोजीची मतदार यादी ग्राह्य धरण्यात येईल. दि.13 ऑक्टोंबर रोजी प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात येईल. दि.13 ते 18 ऑक्टोबर पर्यंत हरकती व सुचना दाखल करता येणार आहे. दि.21 ऑक्टोबर रोजी प्रभाग निहाय अंतिम यादी प्रसिध्द करण्यात येईल.  नागरिकांना सदर यादीवर हरकती व सुचना दाखल करावयाच्या असल्यास दि.13 ते 18 ऑक्टोबर या कालावधीत व शनिवार दि 15 ऑक्टोबर रोजी सुध्दा दाखल करता येणार आहे, असे उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी अधिकारी ग्रामपंचायत निवडणूक यांनी कळविले