समाज उन्नतीसाठी सर्वानी एकत्र येणे गरजेचे

41

अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती श्री.भास्कर तलांडे यांच्या प्रतिपादन
▪️ अहेरी तालुक्यातील अतिदुर्गम दामरंचा भंगारामपेठा येते आदिवासी गोटुल समिती कडून विजयदशमी निमित्ताने आदिवासीचे आराध्य दैवत लंकापती रावण मंडावी यांची कार्यक्रम साजरी करण्यात आली.सर्वप्रथम आदिवासी क्रांतीकारी वीर बाबूराव शेडमाके,बिरसा मूंडा, यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून गोंगो पूजा करण्यात आले.असुन महासम्राट राजा रावण यांच्या जिलकरशाह मडावी यांच्या घरी नऊ दिवसासाठी घट मांडून पूजा अर्चाना करणयात आली होती.आज महासम्राट राजा रावण यांच्या पालखी मडावी यांच्या घरातून काढून पालखी घेवून भव्य दिव्य रैली काढण्यात आली व मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आले.
 त्यावेळी उदघाटन स्थानावरून बोलतांना अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती श्री.भास्कर तलांडे  म्हणाले आज आपण विजयदशमी महाउत्सव व लंकापती रावण मंडावी यांची कार्यक्रम आपण साजरी करत आहोत त्यानिमित्तने सर्व समाज घटक एकत्रित आलो असून  समाजचे उन्नतीसाठी व  सर्वांगीण  विकासासाठी एकत्र राहून काम केल्यास निश्चित विकास होईल त्यासाठी सर्वानी एकत्र येणे गरजेचे असल्यास.प्रतिपादन केले

         तसेच आदिवासी बांधवाना पेसा कायदा,वन हक्क कायदा,आदिवासीचे रुंढी,परंपरा,जल जंगल ज़मीन विषय सखोल अशी मार्गदर्शन करतांना सूरजागढ़ खदाणी मुळे या भागाच्या विकास नसून विनाश होत असून यातून पूँजीपती ना आर्थिक लाभ होत असून जंगलचे खरे मालक आपण असून आपल्याला विश्वासत ना घेतात कोलामार्का अभयारण्य घोषित करण्यात आले असून यामुळे या भागातील काही गावांना विस्थापित केले जाऊ शकतो त्यामुळे सर्वानी एकत्रित राहून लढा देने आज काळाची गरज आहे.
     या कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून दामरंचा ग्राम पंचायतचे सरपंच सौ.किरणताई कोडापे  होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच श्री.जिलकरशाह मडावी,श्री.प्रमोद कोडापे, गंगाराम गावडे,पार्वती कोडापे,आदि होते.
            या कार्यक्रमाचे संचालन छात्रसेन तोडसाम सर ,तर आभार प्रदर्शन सूरज सिडायांनी केले.
          सायंकाळी भोजन करून आदिवासी सांस्कॄतिक कार्यक्रम घेण्यात आले असून यावेळी मरमपली,वेलगुर,तोंडेर,कोयागुडाव परिसरातील ग्रूपनी सहभाग घेतले.असून यावेळी परिसरातील बहुसंख्य महिला व पुरुष उपस्थित होते.