अहेरीत धम्म चक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा*

43

शहरात भव्य भीम रँली
*पंचशील तोरण व मोठा ध्वज आकर्षनाचे केंद्र!*

*अहेरी:*- येथील बौद्ध विहाराच्या पटांगणात ज्ञान प्रसारक नवयुवक मंडळाच्या वतीने धम्म चक्र प्रवर्तन दिन बुधवार 5 ऑक्टोबर रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
    सर्व प्रथम सकाळी पंचशील ध्वजचे ध्वजारोहण बेबीताई अलोने यांच्या शुभहस्ते करण्यात आले. ध्वजारोहण नंतर सामूहिक रित्या त्रिशरण-पंचशील ग्रहण करण्यात आले.
     त्या नंतर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश  टाकन्यात आले. यावेळी प्रा. घोडेस्वार, सुरेन्द्र अलोने, प्रशांत भिमटे, कनिष्ठ अभियंता प्रवीण झाड़े यांनी धम्म चक्र प्रवर्तन दिनाचे महत्त्व व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनाच्या विविध पैलूंवर उजाळा देऊन मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल गर्गम यांनी केले.
     सायंकाळी अहेरी शहरातून भव्य भीम रँली काढण्यात आली. धम्म चक्र प्रवर्तन दिन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषणी व भीमगितानी युवक, युवती व महिला भगिनी उत्साह व जोशपूर्ण नृत्य केले

 
     मुख्य रस्ताकडेच्या दोन्ही बाजूला पंचशील तोरण व झेंडे आणि शहरातील मुख्य चौकात उंचावर पंचशील व निळा ध्वज बांधण्यात आल्याने शहरात सर्वांचे लक्ष वेधुन घेत असून आकर्षनाचे केंद्र बनले आहे. यासाठी युवकांनी परिश्रम घेतले तसेच भोजनदानही ठेवण्यात आले होते.