नवदुर्गा मातेच्या विसर्जनात अहेरी नगरी दुमदुमली!* आमदार धर्मराव बाबा आत्रामही गोंडी गितावर ठेका घेतले!

40

*शेरचे (वाघ) रूप घेऊन कला प्रदर्शित करण्यात आले*
विसर्जन मिरवणुकीत मोठी गर्दी उसळली
*अहेरी:-* सालबादा प्रमाणे यंदाही राजवाड्यातील नवदुर्गा मातेचे गुरुवार 6 ऑक्टोबर रोजी विसर्जन होते. नवदुर्गा मातेच्या विसर्जन मिरवणुकित अहेरी नगरी पूर्णतः दुमदुमली. विसर्जन मिरवणुकित मोठी गर्दी उसळली होती.
     वेगवेगळ्या पद्धतीचे ढोल-ताशे, वाजंत्री, डीजेच्या तालावर युवक थरकले. तर आमदार धर्मराव बाबा आत्राम, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम, युवा नेते ऋतुराज हलगेकर आदिवासी गिताच्या तालावर जबरदस्त ठेका घेतले

    विसर्जन मिरवणुकीत शेरची (वाघ)नक्कल, रोशनाई, फटाक्यांची आतिषबाजी, कला प्रदर्शित करणारे वेगवेगळ्या पद्धतीचे वेशभूषा हे नवदुर्गा मातेच्या विसर्जनात आकर्षणाचे केंद्र होते.
    ‘ जय माता दी’ च्या जयघोषणी आणि युवक व युवतींच्या नृत्यांनी अहेरी नगरी पूर्णतः दुमदुमली. विसर्जन मिरवणुकीत बहुसंख्येने भाविक व नागरिक सामील होते.