अहेरी तालुक्यातील मौजा – कमलापुर येथे दरवर्षी प्रमाणे आदिवासी समाजाचे गोंड राजा रावणजी यांच्या महा गोंगो ( पुजा) करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष – तिरू. शंकर आत्राम ( माजी उपसरपंच कमलापुर )
कार्यक्रमाचे उद्घाघटिका – तिरुमाय भाग्यश्री ताई आत्राम ( माजी जिल्हापरिषद अध्यक्ष गडचिरोली )
पुजारी/ पेरमा – तीरू. मलाय्या साकाटी यांचे हस्ते कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आला.
सदर गोंगो हे दरवर्षी प्रमाणे मौजा – कोडसेलगुडाम ( कमलापुर ) येथील गोटुल भूमी मध्ये ११ दिवसा पुर्वी पासुनच गोंड राजा रावणजी यांच्या गोंगो ची सुरुवात झालेला होता आणि दासराच्या दिवशी मौजा – कोडसेलगुडाम येथे राजा रावण जी यांच्या गोंगो करून, रावणजी यांच्या पालखीची रॅली हे कोडसेलगुडाम पासुन ते ताटीगुडाम, कोटालगुडाम, चिंतलगुडाम, कमलापुर ते कार्यक्रम स्थळापर्यंत रॅली काढण्यात आला.
कार्यक्रम स्थळी आदिवासी समाजाचे सप्तारंगी झेंडा पडकवून, भिमाल पेन चा पुजा करुन, उपस्थित समाज बांधवांना मार्गदर्शन करण्यात आले
तसेच सायंकाळी कोडसेलगुडाम येथील गोटुल मध्ये पारंपरिक रेल्ला नृत्य, गोंडी गीतेवर संस्कृतीचे कार्यक्रम सादर करण्यात आला.
यावेळी उपस्थित कमलापुर चे माजी सरपंच – तिरु. संबय्या करपेत, येरमनारचे माजी सरपंच – तीरु. बालाजी गावडे, आलापल्ली चे माजी – ग्रा.पं. सदस्य तिरू. कैलास कोरेत, तिरू. मडावी सर – ( नालामपल्ली CG ), तिरू. बाबुराव तलांडी – ( तुमिरकसा ), तिरू. बाबुराव तोरेम – ( भांगारामपेठा ), तिरू. लच्या आत्राम – ( आसा ), तिरु. मासा मडावी – ( नैनेर ), तीरू. आनंदराव आत्राम – भुमक, तिरू. शंकर आत्राम – वड्डे, नगारा वाध्या – तिरु. गंगाराम कुसरम, तिरू. पेंटाय्या मडावी, तीरुमाय. सुशीला गावडे- ( कमलापुर ), तिरुमाय. नीलिमा करपेत, तिरूमाय. सुगंधा साकाटी, सुलभा सिडाम, कार्यक्रमांचे व्यवस्थापक तिरू. आणेराव आत्राम, तीरू. विनोद कुसरम, तीरू. पेंटू सिडाम, भोजन व्यवस्थापक – तीरू. रामशाही आलाम, तीरू. येराय्या मडावी, तिरू.संतोष मडावी तसेच मौजा – कोडसेलगुडाम, कमलापुर गावातील सर्व महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.