आरमोरी ; वाघाच्या हल्ल्यात आरमोरी तालुक्यातील देशपूर येथील इसम ठार झाल्याची घटना आज ७ ऑक्टोबर रोजी सुमारे २ वाजतच्या सुमारास समोर आली आहे
सविस्तर वृत्त या प्रमाने आहे की खेमराज आत्राम हे आपल्या सहकाऱ्यांसोबत गुरे चारण्यासाठी गेला होता गुरे चारत असताना दबा धरलेल्या वाघाने अचानक त्याच्यावर हल्ला केला व काही अंतरापर्यंत त्याला नेऊन ठार केले
सदर या घटनेची माहिती गावकऱ्यांना माहिती होताच पाहण्यासाठीं गर्दी केली होती व या संदर्भात वनविभागाला माहिती देण्यात आली व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठले