अहेरी :मुल येथील युवा सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार तसेच राजुरी स्टील कंपनीचे असिस्टंट जनरल मॅनेजर मनिष रक्षमवार यांचा त्यांनी केलेल्या गौरवास्पद कामगिरीचा राजुरी स्टील कंपनीने गौरव केला आहे.
कंपनीचे संचालकाचे हस्ते त्यांना, मुंबई येथे आऊटस्टँडिंग परफॉर्मन्स पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार केला आहे.
मागील वर्षी कोरोना काळात आपले जन्मदिन साजरा न करता नऊ ऑक्सिजन सिलेंडर उपजिल्हा रुग्णालय मुल येथे देऊन रुग्णांचे प्राण वाचविण्याचे गौरवास्पद कार्य रक्षमवार यांनी केले आहे. त्यांच्या कार्याचा गौरव राजुरी स्टील कंपनीने या निमित्ताने केला आहे.
मनीष रक्षमवार हे पत्रकार असून त्याने अनेक सामाजिक प्रश्नाला वाचा फोडली आहे.
त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल अनेकांनी त्यांचे
अभिनंदन केले आहे