आमदार कृष्णा गजबे यांचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश
दि. 08 ऑक्टोंबर 2022
अहेरी:आरमोरी तालुक्यात गेल्या अनेक दिवसापासून अतिशय धुमाकूळ माजवत असलेला सिटी वन आणि सिटी सिक्स या वाघाने दिवसेंदिवस शेतकरी मजुरांची आणि शेतमजुरांना ठार करणे सुरू केले असून, आज रामाळा येथील आनंदराव दुधबळे या व्यक्तीला सुद्धा वैरागड- रामाळ्याच्या जंगलामध्ये ठार केले. या घटनेची माहिती आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांना मिळताच ते आज वनपरिक्षेत्र कार्यालय आरमोरी येथे येऊन भेट दिले. या भेटीदरम्यान उपस्थित असलेले सी.सी.एफ. श्री किशोर मानकर आणि डी.एफ.ओ. श्री धर्मवीर सालविठ्ठल हे उपस्थित होते.
यावेळी आमदार कृष्णा गजबे यांनी आरमोरी, कासवी, आष्टा, पळसगाव, जोगीसाखरा, वैरागड या परिसरात सिटी वन आणि सीटी सिक्स हे दोन वाघ प्रामुख्याने लोकांवरती हल्ला करीत आहेत आणि दिवसेंदिवस जनतेवर लोकांवरती केलेले हल्ल्यांची संख्या वाढत आहे आणि यामुळे लोकांचे लोकांना प्राण गमवावे लागत आहे. या दोन्ही वाघांना तात्काळ जेरबंद करण्यात यावे असे सूचना आमदार कृष्णा गजबे यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. सिटी वन या वाघाला जेरबंद करण्यासाठी ताडोबा येथून डॉक्टर रमाकांत खोब्रागडे यांची टिम उपलब्ध झाली असून त्या वाघाचा तपास सुरू आहे. तसेच सीटी सिक्स या वाघाला जेरबंद करण्यासाठी अमरावती वरून वनविभागाची टीम उपलब्ध झाली असून या दोन्ही वाघांना जेरबंद करण्यासाठी कसोटीचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती सी.सी.एफ. श्री मानकर यांनी आमदार महोदयांना दिली. येत्या काही दिवसात जर या दोन्ही वाघांना जेरबंद करण्यात आले नाही तर जनतेचा मोठ्या प्रमाणे आक्रोश वनविभागा प्रती तयार होईल आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागेल. त्यामुळे या दोन्ही वाघाना तात्काळ जेर बंद करण्यात याव्या अशी सूचना आमदार कृष्णा गजबे यांनी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत. यावेळी आ.गजबे यांच्यासोबत नगराध्यक्ष पवन नारनवरे, भाजपा अध्यक्ष नंदू पेट्टेवार,भाजयुमोचे तालुकाध्यक्ष पंकज खरवडे, उपस्थित होते.