*आ.धर्मराव बाबा आत्राम यांच्याहस्ते 33 केव्ही उपकेंद्राचे उदघाटन*

41

*अतिदुर्गम व आदिवासीबहुल गावे होणार प्रकाशमय


एटापल्लीतालुक्यातील अतिदुर्गम व आदिवासीबहुल म्हणून ओळख असलेल्या जांभिया (गट्टा) येथे नुकतेच अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्याहस्ते 33 केव्ही उपकेंद्राचे उदघाटन करण्यात आले.मागील अनेक वर्षांपासून एटापल्ली तालुक्यातील काही गावात अजूनही वीज पोहोचली नाही.त्यामुळे या परिसरातील नागरिकांना विजेअभावी अनेक संकटांना सामोरे जावे लागत होते.एवढेच नव्हेतर या परिसरातील अनेक गावांचा विजेचा भार एकाच उपकेंद्रावर असल्याने परिणामी या परिसरातील नागरिकांची 33 केव्ही उपकेंद्राची मागणी होती.ती मागणी आता पूर्ण झाली असून दुर्गाम भागातील विजेची समस्या सुटल्याने अंधारलेले गावे प्रकाशमय होणार आहे

33 केव्ही उपकेंद्राच्या उदघाटन प्रसंगी
माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ऋतुराज हलगेकर, जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, युवक जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर, उपाध्यक्ष फहिम काझी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा महासचिव  कैलाश कोरेत , बेबी नरोटे माजी सभापती पं. स एटापली,रमेश टिकले नगरसेवक एटापली ,सरिता गावडे नगरसेविका ,निर्मला हीचामी नगरसेविका, जांभिया पोलीस पाटील लालूं हीचामी, सरपंच राजू नरोटे ,उपसरपंच चावदू दोरखडी, किशोर हीचामी सेवानिवृत्त मुख्याध्यापक ,रेणु पुंगाठी माजी सरपंच जाबिया, कन्ना गोटा पोलीस पाटील गट्टा ,मारुती लेकामी उपसरपंच गट्टा, पूनम लेखामी सरपंच गट्टा , तसेच ललिता मडावी महिला तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एटापल्ली ,संजना हीचामी माजी नगरसेविका, विजुभाऊ अतकमवार, संभा हिचामी,लक्ष्मण नरोटे, दोडगे गोटा, निरवा लेकामी,स्वामेन्द्र लेकामी, दिनेश लेकामी, लक्ष्मण जेट्टी ,रमेश तलांडी, सत्यनारायण मेरगा,आधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.