*आदिवासी समाजावरील अन्याय खपवून घेतला जाणार नाही*

43

*माजी आमदार दिपक दादा आत्राम यांचे प्रतिपादन*

           *बुर्गी येथे आदिवासी विद्यार्थी संघाकडून भव्य मेळाव्याचे आयोजन*

   *एटापल्ली*….गडचिरोली जिल्ह्यात व अहेरी विधानसभा क्षेत्रात दिवसेंदिवस आदिवासी समाजावर अन्याय व अत्याचार होत असून आदिवासी समाजावर होत असलेल्या अन्याय व अत्याचार कदापीही खपवून घेतला जाणार नाही असे रोखठोक प्रतिपादन आदिवासी विद्यार्थी संघाचे नेते व अहेरीचे माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी केली आहे.
ते एटापल्ली तालुक्यातील नक्षलग्रस्त व मागासलेल्या गाव असलेल्या बुर्गी येथे आदिवासी विद्यार्थी संघाकडून आयोजित मेळाव्यात अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
या मेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणून आदिवासी विद्यार्थी संघाचे सल्लागार व माजी जि.प.सदस्य कारूजी रापंजी,माजी जि.प.सदस्य संजुभाऊ चरडुके,बुर्गी ग्राम पंचायतीचे सरपंच विलास गावंडे,गोसुपाटील हिचामी,मल्लाजी गावडे,चिनाजी वेलादी,पांडुरंग कंगाली, पोलीस पाटील राजू हिचामी,माजी सरपंच विजय कुसनाके,दिलीप गंजीवार आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळीमेळाव्याला उपस्थित मान्यवरांचे कार्यकर्त्यांनी  पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

मेळाव्याचे उदघाटन मान्यवरांचे हस्ते आदिवासी दैवतांचे प्रतिमांना माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून करण्यात आली.
पुढे बोलतांना माजी आमदार आत्राम म्हणाले,एटापल्ली तालुक्यातील प्रत्येक गावात आज अनेक समस्या असून या समस्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असंतांना ज्यांच्यावर समस्या सोडवण्याची जबबादारी जनतेनी सोपविली असे आपले विद्यमान आमदारांनी याकडे पाठ फिरविल्याचे गंभीर आरोप ही त्यांनी यावेळी केले. मेळाव्याचे यशस्वी आयोजनासाठी इरफाजी मडावी,रामा तलांडी,शंकर तलांडी,प्रपुल दुर्गे,श्रीनिवास बिरमवार,रामा मडावी,अजयभाऊ मडावी, संदीप बडगे आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. या मेळाव्याला बुर्गी व परिसरातील असंख्य नागरिकांनी उपस्थिती दर्शविली.