देसाईगंज:
संपुर्ण जगात आज स्पर्धेचे युग सुरु आहे या स्पर्धेच्या युगात स्वताचे सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी मानव नैतिक मुल्यांना पायदळी तुडवतांना दिसत आहे बुद्धाचा धम्म वैर भावना नष्ट करतो मानवाला जिवन जगतांना शांती अहिंसा करुणा व मैञी या तत्वांची जोड असल्यास तो जिवनात प्रगती साधु शकतो जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी बुद्ध तत्वद्न्यान अंगिकारले पाहिजे असे प्रतिपादन आम कृष्णाभाऊ गजबे यांनी केले.
देसाईगंज येथिल जेतवन बुद्ध विहारात वर्षावास समारोप व ग्रथालयाचे उद्घाटन कार्यक्म आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाला आमदार कृष्णा गजबे यांचेसह भदंत करुणा बुद्ध ज्योती भदंत लोकसंघ टेंबा टिबैती कैंम्प बौद्ध समाज कोअर कमेटी चे विजय बंसोड अड्व बाळकृष्ण बांबोळकर इंजि नरेश मेश्राम डाकराम वाघमारे राजरतन मेश्राम हंसराज लांडगे प्रकाश सांगोळे भिमराव नगराळे माजि नगरसेवक हरिष मोटवानी छगन सेडमाके सहा पो उप निरी अशोक नंदेश्वर यांचेसह बौद्ध समाज कोअर कमेटी चे सदस्य व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमात आपले विचार व्यक्त करतांना आम कृष्णाभाऊ गजबे म्हणाले की आज संपुर्ण जगात सत्ता हस्तगत करण्यासाठी मानव नैतिक मुल्यांना पायदळी तुळवितांना दिसत आहे चढाओढी च्या या युगात मानव वैरत्व निर्माण करतांना दिसुन येत आहे युद्धातुन कोणत्याच समस्येचे निराकरण होऊ शकत नाही जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी बुद्ध तत्वद्न्यान अंगिकारणे आवश्यक आहे असे प्रतिपादन आम गजबे यांनी केले जेतवन बुद्धविहार बांधकामा करिता १० लक्ष रुपयाचा निधी उपलब्ध करुण देण्याची ग्वाही ही गजबे यांनी दिली कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कुमार मेंढे देवराव धोंगडे प्रितम जनबंधु सागर बंसोड यांचेसह मंडळाच्या सदस्यांनी यथोचित प्रयत्न केले.