कारंजा – राष्ट्रीय महामार्गवर संध्याकाळी चार च्या सुमारास कारंजा पासून एक किलोमीटर अंतरावर पांडे पेट्रोल पंपाजवळ एसटी बसने धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला दोघेही कारंजा कृषी अधिकाऱ्यांकडे संत्राचे परमिट घेण्याकरिता आले होते हे कारंजा तालुक्यातील मेठहिरजी येथील रहिवासी होते MH 31 5798 क्रमांकाची मोटरसायकल विरुद्ध दिशेने पेट्रोल भरण्यासाठी मोटर सायकल वळवली असता मागून येणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस क्रमांक 13 C V 8332 शेगावरून ब्रम्हापुरी कडे जात असताना त्या मोटर सायकलला जबर धडक दिली त्यात रामदास देवाजी भलावी वय 70 यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तसेच प्रल्हाद देवराव यूनाते वय 40 यांचा कारंजा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला.
या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक दारासिंग राजपूत , उपनिरीक्षक सचिन मानकर , नितेश वैद्य , गुड्डू थुल , अंकुश रामटेके करित आहे.