अहेरी:-*. विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यानी मोसम येथील गावकरी लोकांशी गावातील समस्या बद्दल सविस्तर चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी गावाचं विकासार्थ कामाची मागणीसाठी श्री सालय्या कंबलवार ग्रामपंचायत सदस्य देवलमरी यांच्या हस्ते निवेदन देण्यात आलं.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणुन आमदार धर्मरावबाबा आत्राम, सिनेट सदस्य गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती भाग्यश्रीताई आत्राम, माजी पंचायत समिति सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम, प्रमुख्याने उपस्थित होते. तसेच राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी जिलाध्यक्ष रविभाऊ वासेकर, फाईमभाई काझी, विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येर्रावार, तालुका अध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार उपस्थित होते.
निवेदनात दिलेल्या कामे टप्याटप्याने पुर्ण करीन असे आश्वासन आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी दिले. या कार्यक्रमाचे सुत्रासंचालन व आभार श्री सालय्या कंबलवार ग्रामपंचायत सदस्य देवलमरी यानी मानले गावातील प्रतिष्ठित नागरिक सर्वश्री शंकर सडमेक, रामा मडावी, लालू आलम, सखाराम पोरतेट, जयराम मडावी, पोचम सिडाम, प्रकाश पदमावार, लक्ष्मण मडावी, बक्कय्या राऊत, भिमराव धंदरे, लालु वसंत पंगडी, विशेश्वरराव मडावी, जयराम कंबलवार, राजु कंबलवार व महिला मंडळचे, सदस्य सौ. रामबाई पोरतेट, शशिकला आलाम, मायाबाई नैताम, राजेश्वरी कंबलवार, सुनिता मडावी, पदमा कोडापे, ताराबाई पोरतेट व गावातील युवक आणि महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.