राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा दरम्यान आज भामरागड तालुक्यातील आरेवाडा ,लाहेरी,
धोडराज ,कोटी ,नागरगोंडा, मनेराजाराम, या नक्षलग्रस्त भागात अहेरी विधानसभाचे आमदार आदरणीय धर्मराव बाबा आत्राम यांनी मागील तीन वर्षाच्या कार्यकाळात जवळपास दोन ते अडीच वर्ष कोरोना अशा महामारी बिमारी संपल्यानंतर आपल्याला निवडून दिलेल्या जनतेला कोणत्या अडचण आहे हे जाणून घेण्यासाठी राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेला मागील दहा दिवसापासून वयाच्या 70 व्या वर्षी देखील एक नवयुवक सारख्या तारुण्य रुबाबात आदरणीय धर्मराव बाबा आत्राम यांनी प्रत्येक गावात जाऊन आपल्या जनतेचे समस्या जाणून घेऊन लगेच त्या त्या ठिकाणचे संबंधित अधिकारी यांना भ्रमण द्वारे संपर्क करून शक्यतो काम तिथल्या तिथेच करून जनतेला विश्वास दाखवीत आहे. तसेच या प्रबल क्षेत्रामध्ये मुख्य समस्या असलेल्या मागील अनेक वर्षापासून आदिवासी बांधव अतिदुर्गम भागात आपल्या पोटगीसाठी मागील अनेक वर्षापासून वनजमीन अतिक्रमण करून शेती करीत आहे मात्र त्यांना कोणत्या प्रकारचे वन हक्क पट्टे शासन मार्फत पुरवण्यासाठी अनेक अडचण निर्माण होत आहे त्यासाठी सन्माननीय धर्मराव बाबा आत्राम यांनी त्यांच्या कार्यकाळात मंत्री असताना या क्षेत्रातील जवळपास 25 हजार आदिवासी बांधवांना वन हक्के पट्ट्या देण्यात काम केले होते .मात्र मागील दहा वर्षात बांधवांना कोणत्याच प्रकारच्या योजना चा लाभ मिळाले नाही मात्र या कालावधीत तीन वर्ष वाया गेला असता तरी येणारा दोन वर्षाचा संपूर्ण आदिवासी बांधवांना वन हक्क पट्टे देण्याचे प्रयत्न करू असे धर्मराव बाबा आत्राम यांनी आयोजित प्रत्येक सभांमध्ये संबोधित करीत आहे.
या आयोजित कार्यक्रमांचे प्रमुख उपस्थिती म्हणून मा पंचायत समिती सदस्य श्री हर्षवर्धन धर्मराव बाबा आत्राम तसेच रा.का.यु जिल्हा महासचिव कैलास कोरेत, माजी समाज कल्याण सभापती ईदरशहा मडावी, उपस्थित प्रत्येक गावाचे सरपंच माजी सरपंच पोलीस पाटील तसेच या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे भामरागड तालुकाध्यक्ष रमेश मारगोनवार,भामरागड तालुक्याचे रा.का.ज्येष्ठ तसेच आदिवासी समाजसेवक सब्बार भेग.महिला तालुकाध्यक्ष नंदा नारनवरे मडावी, रमेश बोलमपल्लीवार शहराध्यक्ष भामरागड,तीमा मॅडम, रामजी भांडेकर ,तानुजी सडमेक सरपंच आरेवाडा,केशव परसा,वामन ऊईके, चैतन्य मुंडमा,अनुप मोडक,अविनाश नारनवरे, राजमल येलमुलवार, सतीश उईके, साईनाथ कोडापे उपस्थित सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व प्रत्येक गावातील मोठ्या संख्येने उपस्थित नागरिक.