*##मलेशिया येते होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी रविंद्र भांदककर यांना राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी केली आर्थिक मदत..!!*

40

 अहेरीचे सुपुत्र रविंद्र भांदककर यांनी नुकतीच बँकाक येते झालेली कराटे स्पर्धा जिंकून मलेशिया येते होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली होती, परंतु  मलेशिया येते जाण्यासाठी आणि तिथे राहण्यासाठी त्यांना जेंव्हा आर्थिक अडचण निर्माण झाली, हा दौरा रद्द होईल की काय अशी भीती त्यांना वाटत होती..!!
          अहेरी इस्टेटचे राजे तथा गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव महाराज यांना ही बाब समजताच तत्काळ रविंद्र भांदककर यांना राजेंनी राजमहालात बोलावून त्यांची आस्थेने विचारपूस करीत मलेशिया जाण्यासाठी २५ हजार रुपयांची आर्थिक मदत केली, तसेच ह्यापुढेही कधीही मदत लागल्यास माझ्याकडे या अशी ग्वाही राजेंनी ह्यावेळी दिली..!!
         अहेरी इस्टेटचे दानशूर कै.राजे धर्मराव महाराज यांचे वंशज मनुन तिच परंपरा चालवणाऱ्या मा.राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्याकडे अहेरी राजमहालात येणाऱ्या प्रत्येक गरजूला मदत करण्याचा त्यांच्या स्वभावामुळे ते जनतेमध्ये दानशूर राजे मनुन प्रचंड लोकप्रिय झाले असून, अहेरी राजमहालात येणारा कोणीही गरजू रिकाम्या हाताने कधीही परत जात नाही अशी राजेंची ख्याती झाली आहे..