मा.डॉ.अनंत जाधव आणि डॉ.आश्लेषा जाधव यांचा सत्कार व निरोप

56

अहेरी उपजिल्हा रुग्णालयात २०१८ पासून स्त्री रोग तज्ञ म्हणून डॉ.अनंत जाधव सर व भूलतज्ञ म्हणून डॉ.अश्लेषा जाधव मॅडम रुजू झाले.अत्यंत कमी वेळात अहेरी परिसरात डॉ जाधव दाम्पत्याने लोकांच्या मनात जागा निर्माण केली.दक्षिण गडचिरोली च्या सर्व तालुक्यातील गरोदर माता,कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया महिला करणाऱ्या तसेच छत्तीसगड,तेलंगणा राज्यातील महिला इतरत्र गडचिरोली किंवा चंद्रपूर सारख्या ठिकाणी रुग्णालयात न जाता अहेरी रुग्णालयात जाणे पसंत करत होत्या.
अहेरी उपजिल्हा रुग्णालयात जवळपास १४०० शे प्रसूती व १३०० शे शस्त्रक्रिया डॉ जाधव दाम्पत्याने केल्या आहेत.मृदू स्वभावी आणि हिम्मत देणारे डॉ दाम्पत्य म्हणून त्यांनी सर्वांच्या मनात जागा निर्माण केली.रात्री बेरात्री कधीही डॉ दाम्पत्याने रुग्णांच्या सेवेला प्राधान्य दिले आहे.
   काही खाजगी कारणास्तव डॉ.दाम्पत्य अहेरी उपजिल्हा रुग्णालय येथील सेवा समाप्त करून नागपूर येथे जाणार आहे त्या निमित्य हेल्पिंग हँड्स सेवाभावी संस्था अहेरी,एकता कला व क्रीडा मंडळ अहेरी व श्री विठ्ठल  रखुमाई विवाह सोहळा समिती अहेरी यांच्यातर्फे विठ्ठल रखुमाई मंदिरात डॉ.जाधव दाम्पत्याचा शाल,श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
   यावेळी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि डॉ जाधव दाम्पत्याच्या सेवेबद्दल माहिती दिली.सत्काराला उत्तर देताना डॉ जाधव म्हणाले की अनेक ठिकाणी नौकरी केली असून अहेरीकरांकडून जे प्रेम मिळाले आहे ते न विसरता येण्यासारखे असून अहेरीकरांकडून नेहमीच सहकार्य लाभले आहे.अहेरी सोडून जातांना खूप दुःख होत आहे.मात्र अहेरीकरांशी जुळलेली नाळ कधीच तुटू देणार नाही असे भावोद्गार डॉ जाधव यांनी काढले.अहेरी उपजिल्हा रूग्णलयात वरिष्ठ स्त्रीरोग तज्ञ व वैद्यकीय अधीक्षक डॉ.कन्ना मडावी सर व सर्व वैद्यकीय अधिकारी,कर्मचारी यांचे खूप चांगले सहकार्य व मार्गदर्शन मिळाले असे ही डॉ जाधव सर म्हणाले. 
    डॉ.जाधव मॅडम म्हणाल्या की शहरी भागापेक्षा अहेरी परिसरात निसर्गाच्या सानिध्यात काम करता आले याचे समाधान आहे.अहेरी परिसरातील लोकं प्रेमळ आहेत.आम्हाला सर्वांची खूप आठवण येईल असे त्या म्हणाल्या.
    सत्कार व निरोप संभारंभात हेल्पिंग हँड्स संस्था,एकता मंडळ व विठ्ठल रखुमाई विवाह सोहळा समिती चे सर्व सदस्य,गावातील प्रतिष्ठित नागरिक,महिला वर्ग आदी उपस्थित होते.