ते’ देतायेत निसर्ग सानिध्यातील सहज सोपे शिक्षण .गोटूल मधील मिनी शाळा.

59

गडचिरोली जिल्ह्यातील अतिशय दुर्गम ,दुर्लक्षित नक्षल प्रभावित

एटापल्ली  तालुक्यातील ‘वाळवी’हे छोटेसे गाव …गाव कसले जेमतेम ३०-४०लोकवस्ती…चारही बाजुंनी घनदाट जंगलांनी व्यापलेला जिथे विकासाची गंगा  अजून पर्यंत पोहचलेली नाही..गावात अजून ही रस्ता नाही पायवाटेने गाव गाठता येईल पावसाळ्यात वाळवी ला पोहचणे कर्मकठीणच असे..कारण चारही डोंगराच्या कुशीत उगम पावणाऱ्या नदी नाले पावसाळ्यात दुथळी भरून वाहतं.. वाटेत आट मांडून उभे राहतात नवीन पाहुणा कधीच या नव्या गावात पोहचणार नाही कारण घनदाट जंगल व त्यातील भुलभुलैया पायवाटा च्या चक्रव्यूहात कधी फसेल याचा काही नेम नाही.. ‘वाळवी’ या माडिया वस्तीवर  जिल्हा परिषदेची १ ते ४ वर्ग असलेली एक शिक्षकी शाळा 

शाळेची इमारत अत्यंत धोकादायक संपूर्ण इमारत गळकी व जीर्ण असून शेवटचे घटका मोजत आहे..इमारत कधी उन्मळून पडेल याचा काही नेम नाही सदर इमारतीत विद्यार्थ्यांना घेऊन वर्ग भरविणे जिकरीचे ओळखून वाळवी ग्रामस्थ आणि मुख्याध्यापक श्री श्रीकांत काटेलवार यांनी गोटूल मध्ये शाळा भरविण्याचे ठरविले ..गावातील सर्वांनी ‘ पडूंम सण’ साजरा करीत प्रत्येक कुटुंबातील प्रत्येकाचा सहभाग घेत नव्या दिमाख्यात गोटूल रुपी मिनी शाळेची उभारणी झाली .
या शाळेचं रूप बदलले …या मुलांचे स्थलांतर थांबविले ..सुरुवातीला शाळेचा पट ०१होती आज घडीला १० विध्यार्थी  गोटूल मध्ये बोलीभाषेतून आनंददायी शिक्षण घेत आहे .आदिवासी ची बोलीभाषा माडिया ही त्यांच्या शिक्षणात मोठी अडचण होती.
जंगल भर भिरभिरणारी ती आदिवासी मुले एका जागी स्थिर बसणारी नाहीत हे शिक्षकांनी जाणून स्थानिक माडिया बोलीभाषेतून अध्यापन सुरू केले.माडिया भाषिक विद्यार्थ्यांना सर्वप्रथम माडिया भाषेतून शिकवून नंतर मराठी भाषेकडे नेण्याचा प्रवास सुरु झाला..माडिया भाषिक मराठी बालभारती पाठ्यपुस्तक  आणि माडिया भाषेतील उच्चारातील अंकलिपी ची निर्माती एक दोन शिक्षक मिळून तयार केले त्याचा ही वापर फलदायी ठरत आहे..
निसर्ग ही देवाची सर्वात मौल्यवान देणगी आहे दाट निसर्गाच्या सानिध्यात राहत असल्यामुळे येथील ग्रामस्थांची निसर्गाविषयी अपार प्रेम,आस्था आहे निसर्गातून सहज उपलब्ध होणाऱ्या साधनापासून निर्माण केलेले विविधपूर्ण शैक्षणिक संसाधने विध्यार्थी मोठ्या आस्थेने ,प्रेमाने हाताळतात व मोकळ्या वातावरणात सर्वांगीण विकास साधतात निसर्गातील झाडे मानवाला शुद्ध ऑक्सिजन पुरवतात पण येथील झाडे ऑक्सिजन सोबत शब्द ही पुरवितात..गोटूल मधील रचलेल्या नानाविध उपक्रमामुळे माडिया भाषिक विद्यार्थ्यांना शिकणे सुकर झाले.

ताडी झाडांपासून तयार केलेले  विविधपूर्ण  विना खर्चिक पण टिकाऊ  शैक्षणिक साधने गोटूल मध्ये लावण्यात आली शब्दाचं झाड, स्मृति शेष फलक गोटूल ची शोभा वाढविण्याबरोबर विद्यार्थ्यांचा भाषिक कौशल्य वाढवितात गोटूल मधील मिनी शाळेचे वैशिष्ट्य…१) नैसर्गिक साधनापासून तयार केलेले विविधपूर्ण शैक्षणिक साधने..२)स्मृती फलक..आदिवासी बांधव मृत पावलेल्या व्यक्ती ची आठवण म्हणून स्मृती फलक लावतात..गोटूल मधील मिनी शाळेत पाषाण च स्मृति फलकही मोठ्या दिमाखात उभा आहे ..स्मृती फलकावर ब्लॅकबोर्ड रंग मारुन फलक तयार केलेला आहे..दररोज नवीन शिकण्यासारख्या ओळी ,कविता,सुविचार फळू ने लिहलं जात विध्यार्थी शाळेत आल्यावर या फलकावर काय नवीन लिहलं आहे ते वाचतात…दुसऱ्या दिवशी मुलांना कालच्या दिवशी लिहलेलं विचारलं जात..त्यावरून त्यांची स्मृती सुधारली जाते..३)गोटूल मधील ताडीच्या झाडाचा फळा म्हणून उपयोग..४)शब्दाचं झाड:-मोहच झाडा विषयी आदिवासी बांधवाना विशेष प्रेम आस्था त्या झाडाला शब्दाचं झाडाचं रूप देण्यात आलं..निसर्गातील झाडे मानवाला शुद्ध ऑक्सिजन पुरवितात पण येथील झाडे मानवाला ऑक्सिजन सोबत शब्द ही पुरवितात..५)ताडीच्या फांद्या पासून बाराखडी फांद्या च रूप देण्यात आलं..६)माडिया भाषिक बालभारती पुस्तकांची व माडिया उच्चारातील अंकलिपी..७) अक्षर-शब्द सेतू..८)बोलीभाषेतून शिक्षण..निसर्गाकडे चला …ही भावना विद्यार्थ्यांना मनोमन समजले…निसर्गाकडून ही शिकता येते हे मुलांना मनोमन पटले..एकेकाळी मोडकळीस आलेली शाळा आज नव्याने उभारू पाहत आहे.विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी येथील शिक्षक श्री.श्रीकांत काटेलवार अविरत प्रयत्न करतात. मिनी शाळेची करामत ग्रामस्थ जाणतात .वाळवी शाळेतील शिक्षक व ग्रामस्थांनी निर्मित गोटूल मधील मिनी शाळेचा पंचक्रोशीत कौतुक करण्यात येत आहे.जिल्हा परिषद गडचिरोली मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद साहेब,शिक्षणाधिकारी हेमलता परसा मॅडम  यांनी या अभिनव शाळेचे विशेष कौतुक केले…पंचायत समिती एटापल्ली चे गटशिक्षणाधिकारी श्री दीपक देवतळे ,बिट शिक्षणविस्तार अधिकारी श्री विनायक पुरकलवार,केंद्रप्रमुख श्री बेडके सरांचे या कामी विशेष सहकार्य लाभले..