शेतकरी व पशुपालक चिंतेत
राजाराम :- अहेरी तालुक्यातील राजाराम पासून पाच किमी अंतरावर असलेल्या गोलाकर्जी येथील पोट्टी पेंठा मडावी यांच्या मालकीचे बाकडगायीला बिबठ्याने गोठ्यात घुसून फस्त केल्याची आज रात्री घटना घडली आहे.
राजाराम ते गोलाकर्जी वन विभागाच्या जंगलात व शेत शिवारात आठवड्यापासून बिबठ व लहान दोन पिल्लू फिरताना काही नागरिकांना व शेतकऱ्यांना दिसले होते
या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. शेतकरी चिंतेत पडले आहेत व शेतात जागल करणारे शेतकरी जागल करणे कठीण जात आहे.
चक्क आज रात्री गोलाकर्जी बसस्टॅन्ड जवळील मडावी शेतकऱ्याचे गोठ्यात असलेल्या गायीला मारून गोठ्या बाहेर फरफटत नेऊन आतील आतडे व पूफस, कलेजा खाऊन उर्वरित मृत गायीला सोडून बिबठ्याने पड काढलं.गोलाकर्जी परिसरात पशुपालक जास्त असल्याने पशुपालका मध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सदर बिबठ्याला वन विभागाने बंदोबस्त करावी अशी मागणी जोर धरत आहे. वृत्तलिहे पर्यन्त वनविभागाने घटना स्थळी बाकडगायीचे पंचनामा केली नाही. संबंधित विभागाने पंचनामा करून आर्थिक नुकसान भरपाई करून द्यावी अशी मागणी गायमालक व शेतकरी करीत आहेत.








