*माजी जि प अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांच्याहस्ते सभा मंडपाचे उदघाटन*

57

सिरोंचा:-तालुक्यातील व्येंकटापूर ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या ग्लासफोर्डपेठा येथील सभा मंडपाचे उदघाटन सिनेट सदस्य तथा माजी अध्यक्ष जि प गडचिरोली भाग्यश्रीताई आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष वेंकटलक्ष्मी अरवेली, माजी प स सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते समय्या कुळमेथे,ग्रा प सदस्य रवींद्र कार्सपल्ली,ग्रा प सदस्य शेपाली गड्डी, ग्रा प सदस्य शंकर गड्डी,संजीवकुमार मेडी, तिरुपती बोगडामिदी, अमृता तलांडी, पोचम कुमरम,सुरेश मोहरला आदी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
ग्लासफोर्डपेठा येथील नागरिकांनी आ धर्मराव बाबा आत्राम तथा भाग्यश्रीताई आत्राम यांच्याकडे गावात सभा मंडप देण्याची मागणी केली होती.गावातील नागरिकांची अडचण लक्षात घेऊन 2515 इतर ग्रामविकास कार्यक्रम या लेखाशीर्ष अंतर्गत निधी उपलब्ध करून देण्यात आले.

नुकतेच गावात सुसज्ज सभा मंडपाचे काम पूर्ण झाले असून सिनेट सदस्य तथा माजी जि प अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.दिलेलं शब्द पूर्ण केल्याने गावकऱ्यांनी भाग्यश्री ताई आत्राम यांचे आभार मानले.