स्थानिक चामोर्शी येथील प्रलंबित असलेल्या रखडलेल्या विकास कामाकडे लक्ष द्या आशीष भाऊ पिपरे नगर सेवक चामोर्शी

58

दिनांक – 20 नोहेंबर 2022
चामोर्शी :गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका चामोर्शी असून याच
शहरात मोठ मोठे लोकप्रतिनिधी राहतात परंतु स्थानिक चामोर्शी शहरात दुर्लक्ष असल्याने त्यांची निष्क्रियता चव्हाट्यावर आली आहे कारण चामोर्शी शहराची लोकसंख्या पंचवीस हजार पेक्षा जास्त आहे परंतु गेल्या स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतर
सुद्धा येथे सर्वसाधारण प्रवाष्याच्या सोयीसाठी बस स्टँड काय प्रवासी निवारा होऊ शकले नाही ,येथील युवकांना खेळण्यासाठी क्रीडांगण ,ग्रंथालय ,मृत व्यक्तीचे अंत्यविधी करण्यासाठी
समशान भूमी , दहन दफन भूमी व इतर महत्वाचे
प्रश्न जैसे थे आहेत परंतु या विषयाकडे लोकप्रतिनिधींचे पूर्णतः दुर्लक्ष आहे इतका मोठा तालुका स्तरावरील शहर असुन बस स्थानकावर महिला व पुरुष करिता साधे शौचालय उपलब्ध नाही व इतर महत्त्वाच्या विषयांवर नगरसेवक आशीष भाऊ पिपरे ,गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्र सोशल मीडिया प्रमुख रमेश अधिकारी ,सामाजिक कार्यकर्ते माणिकरावजी तुरे ,अशोकजी धोडरे यांनी खासदार अशोक भाऊ नेते यांना निवेदन दिले व निवेदनाची तत्काळ दखल घेऊन खासदार अशोक भाऊ नेते यांनी सबंधित
रखडलेल्या विकास कामांना गती देण्यासाठी मुंबई येथे पाचारण केले व यावेळी आशीष भाऊ पिपरे यांनी सांगितले चामोर्शी शहरातील रखडलेल्या विकास कामांना पूर्ण केल्याशिवाय आपण
गप्प बसणार नाही व सर्व अपूर्ण कामे गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्र खासदार अशोक भाऊ नेते यांच्या  मार्गदर्शनात पूर्ण करणारच
शी ग्वाही दिली