महिलेचा विनयभंग करणाऱ्या गडचिरोल्ली शहरातील येथील आरोपीस पोलिसांनी ठोकल्या बेड्या

40

गडचिरोली ;-शाशकीय कार्यालयात महिलेचा विनयभंग करणाऱ्या  नराधमास गोपनीय व तांत्रिक तपासाच्या आधारे अवघ्या दोन तासात गुलमोहर कॉलोनी येथील आरोपीस पोलिसांनी ठोकल्या बेड्या
सविस्तर वृत्त या प्रमाणे आहे की  पीडित महिला ही जिल्हा परिषद गडचिरोली येथे वरिष्ठ सहायक (लेखा) येथे नौकरीवर असून त्याच विभागातील मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी म्हणून कर्तव्यावर असलेले आरोपी ओंकार रामचंद्र अंबपकर राहणार गुलमोहर कॉलोनी पीडितेला कोणत्या न कोणत्या कारणाने कॅबिन मध्ये बोलावून विनयभंग करण्याचा प्रयत्न करीत असे 
व सदर महिला ही विरोध केल्यास (तुझा सीआर खराब करून नौकारीवरून काढून टाकण्याची धमकी देत असे) या प्रकरणाला कंटाळून पीडित महिलेने गडचिरोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली 
व पोलिसांनी त्या आरोपीवर विविध कलमान्वे गुन्हा नोंद करून तापासात घेतला गुन्हायातील आरोपी हा चंद्रपूर रोड गडचिरोली लँडमार्क हॉटेल जवळील परिसरात लपून बसल्याची माहिती मिळताच त्याला अटक करण्यात आली आहे