भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते राजपूर पॅच येथील नवीन सी.सी.रोडचे लोकार्पण

40

राजपुर पॅच:अहेरी तालुक्यातील राजपुर पॅच येथे माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्रीताई आत्राम यांच्याहस्ते सिमेंट काँक्रेट रस्त्याचे लोकार्पण करण्यात आले.
पंचायत समिती अहेरी अंतर्गत येत असलेल्या राजपूर पॅच येथे मेन रोड पासून ते दिलीप चांदेकर यांच्या घराकडे जाण्यासाठी नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते.पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य निर्माण होत असल्याने येथील काही कुटुंबीयांना नाहक त्रास करावे लागत होते. या ठिकाणी सी.सी.रोड बांधकाम झाल्यास नागरिकांची अडचण दूर होणार म्हणून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रामा बद्दीवार यांनी अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मरावबाबा व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम यांच्या कडे सी.सी.रोड ची मागणी केली होती.नागरिकांची अडचण लक्षात घेऊन आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक योजना अंतर्गत ५ लाख रुपये निधी उपलब्ध करुन दिले.नुकतेच या नवीन सी.सी रोडचे बांधकाम पुर्ण झाले असुन लोकार्पण सोहळा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
 या लोकार्पण सोहळ्याला राजपुर पॅच ग्रामपंचायत चे सरपंचा सौ.मिना वेलादी, ग्रामपंचायत सदस्य मधूकर वेलादी, राष्ट्रवादी विधानसभा प्रमुख लक्ष्मण येरावार, सामाजिक कार्यकर्ते पराग पांढरे,सुमीत मोतकूरवार,महेश बाकीवार,नागेश करमे, रामाजी बद्दीवार,अशोक वासेकर, साईबाबा मडावी, साईनाथ अलवलवार,नागेश पुल्लीवार, दशरथ तलांडे, निखील हलदर, मिनती हलदर, ठाकरे ताई यांच्यासह अन्य नागरीक उपस्थित होते