बोरी येथील ग्रामीण व्हॉलीबॉल सामन्याचे माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते उदघाटन

52

बोरी:अहेरी तालुक्यातील बोरी येथे श्री वर्धराज स्वामी बोरी यांच्याकडून आयोजित ग्रामीण व्हॉलीबॉल सामन्याचे उदघाटन आदिवासी विद्यार्थी संघाचे नेते व माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते उदघाटन सोहळा मोठ्या थाटात पार पडला. या ग्रामीण व्हॉलीबॉल सामन्याचे उदघाटन सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून आविसचे युवा नेते व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कांकडालवार ,प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि.प.सदस्य संजयभाऊ चरडुके,सरपंच शंकर कोडापे, उपसरपंच पराग ओल्लालवार, माजी पं.प.सदस्य छायाताई पोरतेट, राजपूर पॅचचे सरपंच मीनाताई वेलादी, माजी सरपंच महेश सडमेक, माजी उपसरपंच सुरेश गंगाधरीवार,पांडुरंग रामटेके,रमेश आलाम, साईनाथ मडावी,पत्रकार अखिल कोलपाकवार, सचिन रामगोनवार,साईनाथ सदापवार, विलास जंपलवार, जुलेख शेख आदी मान्यवर उपस्तीत होते.  यावेळी माजी आमदार दिपक दादा आत्राम व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी क्रीडा विषयी उपस्थित खेडाळू व क्रीडा प्रेमींना  मोलाचे मार्गदर्शन केले   या ग्रामीण व्हॉलीबाल सामन्यासाठी प्रथम पुरस्कार माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या कडून पंधरा हजार रु.रोख तर द्वितीय पुरस्कार उच्च प्राथमिक शाळा बोरी व राजपूर पॅच कडून दहा हजार रु.रोख तर तृतीय पुरस्कार सरपंच शंकर मडावी व उपसरपंच पराग ओल्लालवार यांच्या कडून संयुक्तरित्या सात हजार रु.रोख व शिल्ड सह अनेक आकर्षक पुरस्कार ठेवण्यात आले.बोरी येथे आयोजित ग्रामीण व्हॉलीबाल सामन्याचे यशस्वी आयोजनासाठी क्रिडा मंडळाचे पदाधिकारी व सदस्य गणांनी परिश्रम घेतले. व्हॉलीबॉल सामन्याचे उदघाटन सोहळ्याला गावकरी,क्रीडाप्रेमी,खेडाळू व आविसचे पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्तीत होते.