ट्रक दुचाकीची समोरासमोर धडक, एक ठार तर दोन जण गंभीर जखमी

45

चंद्रपूर मुल मार्गावरील अजयपूर गावाजवळील घटना
जखमी बाप – लेकाची प्रकृती चिंताजनक
चंद्रपूर ‘:   आज दुपारी बारा वाजताच्या सुमारास चंद्रपूर मुल मार्गावरील अजयपूर गावाजवळ कंटेनर नेत असलेला ट्रक आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने एक जण ठार तर दोन जर गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
  मुल कडून चंद्रपूरला कंटेनर घेऊन जात असलेला  ट्रक क्रमांक एम. एच. 31 एफसी 6175 आणि चंद्रपूरकडून मूल कडे जात असलेली हिरो कंपनी ची दुचाकी क्रमांक एम एच 34 बीई 8603 यांची अजयपुर गावाजवळ समोरासमोर धडक झाल्याने तीन जण गंभीर जखमी झाले होते. याची माहिती रामनगर चंद्रपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या चिचपल्ली पोलीस चौकीतील सहाय्यक फौजदार वसंतराय सिडाम यांना माहिती होतच घटना स्थळावर धाव घेऊन तात्काळ जखमींना चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. परंतु पन्नास वर्षीय सुरेश रायपुरे यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर 50 वर्षीय सिद्धार्थ गडबायले आणि रोहित सिद्धार्थ गडबायले  यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे प्रार्थमिक उपचारानंतर नागपूर ला हलविण्यात आले आहे. सिद्धार्थ आणि रोहित ते बापलेक असल्याची सांगण्यात येत आहे. तिघेही वार्ड क्रमांक 4 दुर्गापूर येथील रहिवासी आहेत. आरोपी ट्रक चालक कृष्ण बहादूर यादव याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनास्थळावर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट दिली असून पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.