खमणचेरू: येथील लॉयड्स मेटल्स वाहन पार्किंग येथे अहेरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मानभाव सर व सहा. पोलीस निरीक्षक बोंडसे सर आणि लॉयड्स मेटलस कंपनीचे अधिकारी विनोद कुमार सर तर्फे सर्व ट्रक चालक – मालकांची बैठक घेण्यात आले. बैठकीत सर्व चालकांना दाट लोकवस्तीच्या ठिकाणी वाहने रस्त्यावर पार्क करू नये, वाहन चालवताना मद्यपान, गांजा किंवा ड्रग्जचा वापरकरू नये याकरिता समुपदेशन करून मद्यपान केल्यास सक्तीची कारवाही करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. वाहन चालवताना वेग नियंत्रणात ठेवने, दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करू नये, एका वाहनातील फरक ७५ ते १०० मीटर ठेवाने, गैरसोयीच्या ठिकाणी वाहन पार्क करू नये ,कोणाच्याही दबावाखाली वाहन चालवू नये,आपत्कालीन वाहने सुरक्षित करा आणि आवश्यकतेनुसार पास द्या, रात्री वरच्या आणि खालच्या दिव्यांचा वापर करा आणि उभे असताना इंडिकेटर लाइट वापरा, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत कंपनीच्या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधा अशा सूचना देण्यात आले नियमाबाहेर कोणतेही कृत्य घडल्यास सक्तीची कारवाही करण्यात येणार असल्याचे या बैठकीत सांगितले दरम्यान उपस्थित १२० ते १५० ट्रक चालक होते .
Home Breaking News पोलीस स्टेशन अहेरी द्वारे लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रान्सपोर्ट सुपरवाईजर व ट्रक...