आष्टी ते आलापली राष्ट्रीय मार्गावरील शेतीची नुकसान भरपाई देण्याची मागणी.

44

जि.प.माजी अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी तहसीलदार साहेबांना निवेदन देवून केली मागणी..!!*

बोरी ते खमनचेरू येथील शेतकऱ्यांच्या वाहू लागले अश्रू च्या धारा आणि देवरूपी अज्जूभाऊ आले अश्रू पूसण्यास माणसातला माणूस खरा..!!

*जिल्हाधिकारी साहेब यांना दिलेली निवेदनाची दाखल घेत पंचनामा सुरू केले मात्र मोबदला मिळाला नाही..!!*

गडचिरोली :-आष्टी ते आलापली राष्ट्रीय महामार्ग क्र.353 या तलाठी कार्यालय साजा क्र.9 मधील बोरी,राजपूर प्याच,शिवनीपाठ,या गावातील शेतकरी आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाह करण्यासाठी शेती करत आहेत,मात्र गेल्या वर्षापासून सूरजागड येतिल लोहा खनिज उत्खनन करून दररोज हज़ारों ट्रक ये-जा करत असल्याने मोठमोठे खड्डे निर्माण झाले असून रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतीवर पूर्णत धूळ पसरत असल्याने शेतातील उभे पिक कापूस,धान पिके नष्ट होऊन शेतकऱ्यांना आर्थिक व मानसिक संकटात सापडले आहेत.तरी शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची मोका पंचनामा करून नुकसान भरपाई देण्यात  यावी अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री अजयभाऊ कंकडालवार यांनी जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे निवेदन देवून मागणी केली होती त्यानुसार महसूस विभाग व कृषि विभाग कडून सर्वे केले मात्र अजून पर्यंत मोबदला मिळाले नसून धातुर-मातूर सर्वे करण्यात आली आहे.त्यामुळे आज तहसीलदार यांना पुन्हा निवेदन देण्यात आली असून येत्या 12/12/2022 सम्पूर्ण शेतकऱ्यांचे सर्वे योग्य मोबदला देण्यात यावी अन्यथा उपोषण करण्यात येईल असे निवेदन देण्यात आले.यावेळी माजी जि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार सहित माजी सभापती श्री.भास्कर तलांडे,माजी जि.प.सदस्य श्री.अजय नैताम, गावातील प्रतिस्टित  व शेतकरी श्री.शंकर कोडापे सरपंच बोरी,सौ.मीनाताई वेलादी सरपंच राजपूर प्याच, सुरेश गंगाधरीवार माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य,सुरेश आदे,गोपाळ आदे,चंदु मौहूर्ले,बळवंत आदे,नागेश मोहूर्ले,मीना कावळे,रुपेश चांदेकर,सतीश दैदावार,विलास निकेसर,नागेश वेलादी,शंकर पम्पेलवार, शायलू मडावी सरपंच खमनचेरु,प्रभाकर मडावी,मारोती मडावी,नितीन गुंडावार,अजय मडावी,शोभा मडावी,मधुकर वेलादी,शंकर कम्पेलवार, रुपेश चांदेकर, शंकर निकेसार,बापू ठाकरे,रामुलु कुळमेथे,मधुकर वेलादी,जितेंद्र शेंडे,सुरेश आदे,सुरेश निकेसर, नागेश मोहूर्ले,रामभाऊ आदे,गोपाळा आदे,पेंटू अलोने,सुरेश आडे,गोपाळा आदे, चंदू मोहूर्ले,प्रभाकर वेलादी,मारोती मडावी,अजय मडावी,नागेश मोहूर्ले,भीमराव कॅम्पेलवार,पतरूजी ठाकरे,दसरू निकोडे सह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.