सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामावर प्रश्नचिन्ह

44

भाग्यश्रीताई आत्राम यांनी घेतले कर्मचाऱ्यांचा क्लास

अहेरी:-आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या प्रयत्नानंतर अहेरी तालुक्यातील विविध रस्ते दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाले आहे.मात्र,संबंधित विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे काम व्यवस्थित होत नसल्याचे ओरड सुरू असल्याने माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी प्रत्यक्ष भेट देऊन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांची क्लास घेऊन दर्जेदार काम करण्याबाबत सूचना केल्या.

पावसाळ्यात अनेक रस्ते, नदी-नाल्यावरील पुलांची दुरावस्था झाली.त्यात अहेरी विधानसभेतील रस्त्यांचा सुद्धा समावेश होता. अहेरी-आलापल्ली,अहेरी-वटरा,अहेरी ते महागाव या रस्त्यावर खड्ड्यांचा साम्राज्य निर्माण झाल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता.ही अडचण लक्षात घेऊन अहेरी विधानसभेचे आ धर्मराव बाबा आत्राम यांनी निधी खेचून आणून त्वरित कामाला सुरुवात करण्याचे संबंधित विभागाला निर्देश दिले होते.

अखेर या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाले.मात्र, निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याची ओरड सुरू असल्याने माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांनी अहेरी ते आलापल्ली रस्त्याच्या कामावर प्रत्यक्ष भेट देऊन कामाची पाहणी केले.यावेळी संबंधित कंत्राटदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांना कामाच्या स्थळी पाचारण करून चांगलाच क्लास घेऊन कामात सुधारणा करण्याबाबत सूचना दिल्या.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरी तालुका अध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार,अरबबाबू पठाण,सुलतान खान पठाण, सोमा झाडे, जाफर अली सय्यद, इरफान शेख, अफसर खान, आफ्रिदी सय्यद, अन्सार सय्यद, अरमान शेख, मुजाहिद कुरेशी, श्रीकांत मद्दीवार, नगर सेवक अमोल मुक्कावार,नगर सेवक श्रीनिवास चठारे,माजी सरपंच बालाजी गावडे, संतोष येमुलवार,ताजु कुळमेथे, मखमुर शेख आदी कार्यकर्ते उपस्थित होते.