तिमरम गुड्डिगुड्डम येथील पूल वजा बंधारा बांधकामाचे भूमिपूजन.

69

माजी आमदार श्री.दिपकदादा आत्राम यांच्या प्रमुख उपस्थित श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते भूमिपूजन.

 तिमरम,गुड्डिगुड्डम,निमलगुडम  परिसरातील शेतकऱ्यांना होणार सिंचनाची सोय.

तिमरम:  अहेरी तालुक्यातील तिमरम  ग्राम पंचायत अंतर्गत येणाऱ्या  नाल्यावर पूल वजा बंधारा बांधकामासाठी जिल्हा परिषदेचे माजी श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी  गडचिरोली जिल्हा परिषदेकडून जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत जलसंधारण विभागाकडून ७०  लक्ष रु. निधी मंजूर करण्यात आले. या पूल वजा बंधारा बांधकामाचे भूमिपूजन सोहळा आज तिमरम नाल्यावार अहेरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार श्री.दिपकदादा आत्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार हस्ते उत्साहात पार पडला.तिमरम येथील नाल्यावर मागील अनेक वर्षांपासून पुलाचे बांधकाम न झाल्याने  येथील आदिवासी बांधव व नागरिकांना दरवर्षी पावसाळ्यात नाहक त्रास होत होता.मागील दौऱ्यात येथील गावकऱ्यांनी ही समस्या जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांच्या निदर्शनास आणून दिले असता जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांनी स्वतः नाल्यावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केले होते.व या नाल्यावर पूल वजा बंधारा बांधकामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे येथील नागरिक व शेतकऱ्यांना ग्वाही दिले होते.जिल्हा परिषदेच्या मागील नियोजन समितीच्या सभेत तिमरम नाल्यावार  पूल वजा बंधारा बांधकामासाठी जि.प.माजी अध्यक्ष कंकडालवार यांनी संबंधित विभागाला आवश्यक निधी उपलब्ध करून दिले.जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांनी तिमरम,गुड्डिगुड्डम,निमलगुड्डम  येथील जनतेला दिलेल्या ग्वाही  पूर्ण केल्याने येथील सर्व गावकरी व शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.अहेरी  तालुक्यातील एकही  नाल्यावर आजपर्यंत पूल वजा बंधारा बांधकाम करण्यात आले नाही मात्र माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांनी अध्यक्ष बनले तेंव्हा  या नाल्याची पाहणी केली त्यानंतर त्यांनी  गावातील नागरिकांना ये -जा करण्यासाठी पूल व परिसरातील शेतकऱ्यांसाठी बंधारा बांधून दिल्यास पावसाळ्यात नाल्यातून वाहणाऱ्या पाण्याची साठवणूक होऊन शेतकऱ्यांना सिंचनाची सोय होईल म्हणून पहिल्यांदाच तालुक्यात त्यांच्या संकल्पनेतून पूल वजा बंधाऱ्याचे बांधकाम  होत आहे.या पूल वजा बंधारा बांधकामाची येत्या पावसाळ्यात परिसरातील शेतकरी व  गावातील नागरिकांना याचे सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे.यानंतर अहेरी तालुक्यांत असे कामे घेण्यात येणार आहेत.पूल वजा बंधारा बांधकाम भूमिपूजन सोहळा प्रसंगी माजी आमदार श्री.दिपकदादा आत्राम,सहित माजी  प.स.सभापती श्री.भास्कर तलांडे ,माजी जि.प.सदस्या कु.सुनीता कुसनाके,तिमरमचे सरपंच सौ.सरोजना पेंदाम,उपसरपंच श्री.प्रफुल्ल नागूलवार,नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,माजी सरपंच तथा विद्यमान ग्राम पंचायत सदस्य श्री.विजय कुसनाके,गुलाबराव सोयाम,वेलगुरचे उपसरपंच श्री.उमेश मौहूर्ले, माजी सरपंच महेश मडावी,उपसरपंच सौ.शशिकला पेंदाम,माजी उपसरपंच श्री.संजय पोरतेट,माजी सरपंच धर्मराज पोरतेट,अवीकाचे अध्यक्ष श्री.जयराम सिडाम,माजी सरपंच श्री.वसंत सिडाम,सुधाकर आत्राम,गागंरेड्डीवार सावकार,राकेश सोयाम, नागरिक ,शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्तीत होते..!!