राजाराम :दिनांक 10/12/2022 रोजी डी/09 बटालियन सी.आर.पी.एफ तर्फे नक्षलवादी कारवाया रोखण्यासाठी उपपोलीस स्टेशन राजाराम खांदला दिनांक 10/12/2022 रोजी अहेरी तहसील मधील पत्तीगाव येथे नागरी कृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यात 09 बटालियन सीआरपीएफ पत्तीगाव, चिरेपल्ली आदी गावांतील शेतकऱ्यांच्या सिंचन व पिण्याच्या पाण्यासाठी पत्तीगाव येथे तलाव खोदून ग्रामपंचायतीकडे सुपूर्द केला. तलवाचे उद्घाटन सी.आर.पी.एफ.चे कमांडेंट श्री.आर.एस. बाळापूरकर यांचा शुभ हस्ते झाले त्यावेळी D/09 कंपनी कमांडर मोहम्मद अयुब खान, राजाराम पोलीस स्टेशन प्रभारी श्री.रविंद्र भोरे व PSI.सचिन चौधरी व ग्रामपंचायत सरपंच सौ. सुमन तुकाराम आलाम, श्री.नारायण आलम, शामराव मडावी, अनिल आलाम, श्रीनिवास आलम, सौ.पंचकुला आलम, राजू आलम व आदी ग्रामस्थ उपस्थित होते.सी.आर. सी.आर.पी.एफ.चे अधिकाऱ्यांनी सांगितले की, ग्रामीण आणि दुर्गम भागाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. जेणे करून या परिसरातील लोकानी, नागरिकांनी या योजनांचा लाभ घ्यावा आणि त्यांचा अवलंब करावा.असे आवाहन् केले. तलाव् बांधकाम्/ स्थापने संदर्भात कमांडंट सर सांगितले की पत्तीगाव हा दुष्काळी भाग असून, येथील शेतकऱ्यांना उन्हाळ्यात सिंचनासाठी आणि गुरांना पिण्यासाठी पाणी मिळण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागतो, त्यासाठी या तलावातून गावाला पाणीपुरवठा केला जाऊ शकतो. सरकारने हे पाऊल जनतेच्या हितासाठी उचलले आहे.शेवटी उपस्थित सर्व गावातील लोकांनी आपले मनोगत व्यक्त करून तलाव बनवण्यासाठी अतिशय स्तुत्य पाऊल उचलले असले बाबत CRPF व जिल्हा पोलीस प्रशासनाचे आभार व्यक्त केले.