उप पोलीस स्टेशन राजाराम खा व महसूल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून

57

आज दिनांक 11/12/2022 रोजी उप पोलीस स्टेशन राजाराम खा व महसूल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून  पोलीस अधिक्षक मा. श्री. निलोत्पल सा. अपर पोलीस अधिक्षक मा.श्री. अनुज तारे सा.  (अभियान) अपर पोलीस अधिक्षक मा. श्री. कुमार चिंता सा.गडचिरोली, अपर पोलीस अधिक्षक मा. यतिन देशमुख सा. व उप विभागीय पोलीस अधिकारी ठाकूर सा. यांच्या मार्गदर्शनाखाली
        मौजा उप पोलीस स्टेशन राजाराम येथे भव्य सात बारा काढून देणे करीता कॅम्प घेण्यात आला सदर कॅम्प मध्ये हद्दीतील साजा क्र. 23,24 राजाराम, खांदला परिसरातील 15 नागरिकांना सात बारा, 2 पॅन कार्ड, 1 वन हक्क दावा अर्ज, देण्यात आले. त्यावरून नागरिकांनी पोलीस दलाचे व महसूल विभागाचे आभार मानले