दीर्घ काळापासून प्रतीक्षेत असलेल्या सिरोंचा- आलापल्ली राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला सुरुवात माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार मा. धर्मराव बाबा आत्राम यांनी केली कामाची पाहणी कामाला सुरुवात

40

सिरोंचा :- सिरोंचा आलापल्ली राष्ट्रीय महामार्ग सध्या सुरू झाला असून सिरोंच्या तालुक्यातील जनतेसाठी एक आनंदाची बाब आहे या कामाची पाहणी माजी राज्यमंत्री व आमदार राजे धर्मराव बाबा आत्राम व राष्ट्रवादी पक्षाचे नेत्या मा.सौ.भाग्यश्री ताई आत्राम ,(हलगेकर) व राष्ट्रवादीचे युवा नेते ऋतुराज भाऊजी हलगेकर व  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष मधुकर कोल्लुरी,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे  नगरसेवक सतिश भाऊ भोंगे, नगरसेवक जगदिश राल्लाबंडीवार, ‌जिल्हा युवा उपाध्यक्ष देवा भाऊ येनंगंदुला, राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष एम.डी.शानू व इतर वेकंठलक्ष्मी आर्वेल्ली महिला जिल्हा उपाध्यक्ष, समाज सेवक सिद्दीक भाई. यांनी सदर कामाची पाहणी केली .

या राष्ट्रीय महामार्गाच्या काम सुरू होण्यासाठी जवळपास 40 गावातील नागरिकांना प्रतीक्षा होती सध्या काम सुरू झाल्यामुळे एक मोठा दिलासा यावेळी या चाळीस गावातील नागरिकांना मिळाला
सिरोंचा ते आलापल्ली जवळपास शंभर किलोमीटरच्या हा राष्ट्रीय महामार्ग कामाला सिरोंचा शहरापासून सुरुवात झाली असून   
जवळपास 70 टक्के सिमेंट काँक्रटेच्या हा राष्ट्रीय महामार्ग होणार आहे