मेट्टीगुडम :अहेरी-तालुक्यातील कोंजेड ग्रामपंचायत अंतर्गत समाविष्ठ मेट्टीगुडम येथे माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम यांच्याहस्ते विविध विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले.
राज्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या कोंजेड ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या मेट्टीगुडम येथील लोकप्रतिनिधी आणि गावकऱ्यांनी सुचविलेले विविध विकासकामे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी तात्काळ मंजूर करून निधी उपलब्ध करून दिली.गावातील विविध विकासकामे नुकतेच पूर्ण झाले असून 15 डिसेंबर रोजी माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले.
यामध्ये सिमेंट रस्ते,मोरी बांधकाम तसेच आदी विकास कामांचा समावेश आहे.याव्यतिरिक्त मेट्टीगुडम येथील चिमुकल्यांना नवीन अंगणवाडी इमारतीचे बांधकाम होणार असून त्याही इमारत बांधकामाचे भूमिपूजन भाग्यश्री आत्राम यांच्याहस्ते करण्यात आले. ग्रा.प.निवडणुकीदरम्यान आ आत्राम यांनी विकास कामांची हमी दिली होती.तात्काळ विकास कामे मंजूर करून पूर्ण केल्याबद्दल गावकऱ्यांनी आ धर्मराव बाबा आत्राम तसेच भाग्यश्री आत्राम यांचे आभार मानले.
विकास कामांचा लोकार्पण आणि अंगणवाडी इमारतीच्या भूमिपूजन दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येर्रावार,तालुका अध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार,कोंजेडचे सरपंच सुनीता मडावी,उपसरपंच सीताराम शंकर मडावी,पोलीस पाटील गोसाई वेलादी,सदस्य श्याम रंगा मडावी,अशोक वेलादी,हणमंतू वेलादी,शंकर मडावी,सुरय्या वेलादी,संतोष वेलादी,रुपेश कारेंगुलवार,मुकुंद तेलाम जाफर अली,मखमुर शेख,इरफान शेख,तिरुपती मडावी,आदी उपस्थित