सिरोंचा :तालुक्यात गावोगावी भेट देवुन लोकांचे समास्यांचे निराकरण करत आहेत.सोबत माजी जिल्हा परिषद अध्यक्षा तथा गोंडवाना विद्यापीठ चे नवनिर्वाचित सिनेट सदस्या मा.सौ.भाग्यश्रीताई आत्राम ( हलगेकर) राष्ट्रवादी काँग्रेस चे युवा नेते ऋतुराज भाऊजी हलगेकर पण उपस्थित राहत आहेत.नुकतेच सिरोंचा तहसील कार्यालयाला माजी राज्यमंत्री व विद्यमान आमदार मा. धर्मराव बाबा आञाम यांनी भेट देवुन तहसीलदार साहेबांना संजय गांधी निराधार योजनेचे प्रलंबित प्रकरणे मंजुर करण्या बाबत चर्चा करुन, थकित मानधन त्वरित अदा करावे म्हणुन निर्देश दिले. पाञ शेत मजुरांचे वन हक्क पट्ठे प्रकरण निकाली लावावे व प्रलंबित असलेले प्रकरण त्वरित मार्गी लावावे असे निर्देश मा.आमदार धर्मराव बाबा आञाम यांनी दिले. यावेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते होते.