कोठारी येथील व्हॉलीबॉल सामन्याचे बक्षीस वितरण माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते संपन्न

45

मूलचेरा….तालुक्यातील कोठारी येथे जय पेरसापेन क्रिडा मंडळाकडून येथील तुळशीरामजी मडावी यांच्या पटांगणावर व्हॉलीबॉल सामन्याचे आयोजन करण्यात आले. या व्हॉलीबॉल सामन्याचे बक्षीस वितरण सोहळा नुकताच मोठ्या थाटात पार पडला.

            या सामन्याचे बक्षीस वितरण आदिवासी विद्यार्थी संघाचे नेते व माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते सामन्यातील  विजयी संघांना करण्यात आले.

             कोठारी येथे आयोजित  व्हॉलीबॉल सामन्याचे विजयी संघांना  प्रथम पुरस्कार माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडून तर द्वितीय पुरस्कार माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्याकडून तर तृतीय पुरस्कार जयपेरसापेन क्रिडा मंडळाकडून देण्यात आले.

           या व्हॉलीबॉल सामन्याचे बक्षीस वितरण सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून सरपंच रोशनीताई कुसनाके,ग्राम पंचायत सदस्य कालिदास कुसनाके, माजी सरपंच मनीष माराटकर, माजी सरपंच विजय कुसनाके, सतीश पोरतेट, जुलेख शेख,संदीप बडगे, मुत्यालू कडते, काशीनाथ कडते,किशन कडते, गुरुदास कडते,संदीप तोरे, जितेंद्र कडते, पेंटाजी कडते,लक्ष्मण कडते,हनुमंतु कडते, सीताराम कडते,यादव आत्राम, तुळशीराम मडावी, धर्मेंद्र सिडाम आदी मान्यवर उपस्थित होते.

              या व्हॉलीबॉल सामन्याचे यशस्वी आयोजनासाठी जय पेरसापेन क्रीडा मंडळाचे पदाधिकारी व सदस्य गणांनी अथक परिश्रम घेतले. उदघाटन व बक्षीस वितरण सोहळ्याला क्रीडाप्रेमींसह गावकरी मोठ्या संख्येने उपस्तीत होते.