उप पोलीस स्टेशन राजाराम खा ,आणि प्राथमिक आरोग्य केंद्र, राजाराम यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आरोग्य तपासणी मेळाव्याचे आयोजन .

61

   राजाराम  :आज रोजी दिनांक 19/12/2022 रोजी  मा. पोलीस अधिक्षक गडचिरोली श्री.निलोत्पल  सो,  मा. अप्पर पोलीस अधिक्षक (अभियान) श्री.अनुज तारे सो. गडचिरोली , मा. अप्पर पोलीस अधीक्षक (प्रशासन)  श्री. कुमार चिंता सो गडचिरोली, अप्पर पोलीस अधीक्षक श्री.यतीश देशमुख सो. अहेरी (प्राणहिता) यांचे  संकल्पनेतून व मा. उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. अमोल ठाकूर सा. यांच्या मार्गदर्शनाखाली उप पोलीस स्टेशन राजाराम खा ,आणि प्राथमिक आरोग्य केंद्र, राजाराम यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आरोग्य तपासणी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले .                             सदर आरोग्य मेळाव्याचे अध्यक्षस्थानी श्री.डॉ. मानकर साहेब (वैद्यकीय अधिकारी) प्राथमिक आरोग्य केंद्र राजाराम, प्रमुख अतिथी श्री. सरदार सिंग  साहेब ( पोलीस निरीक्षक ) CRPF – D/09 राजाराम खां ,   डॉ. अस्मिता देवगडे मॅडम , श्री. नितीश गभने (CHO) प्राथमिक आरोग्य केंद्र राजाराम खां व त्यांची टीम उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन श्री.डॉ. मानकर साहेब प्राथमिक आरोग्य केंद्र राजाराम यांचे हस्ते क्रांतिसूर्य बिरसा मुंडा व वीर बाबुराव शेडमाके यांचे प्रतिमेचे पूजन करून व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.                                                                                            उपस्थित नागरिक यांना श्री. डॉ. मानकर  वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र राजाराम यांनी मलेरीया रोगा पासून बचाव, गरोधर माता यांनी घ्यावयची काळजी व आगंणवाडीतून मिळणाऱ्या लसी याबाबत योग्य ती माहिती देवून आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच असिस्टंट कमांडन्ट श्री. शकील साहेब CRPF यांनी नक्षलींच्या भूलथापांना बळी न पडता शिक्षणाचे माध्यमातून आपले भविष्य उज्वल करण्याबाबत मार्गदर्शन केले. नंतर प्रभारी अधिकारी श्री.विजय कोल्हे , उप पोलीस स्टेशन राजाराम यांनी हजर नागरिकांना पोलिस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती देऊन गडचीरोली पोलीस दला मार्फत राबविण्यात येणारे आरोग्य मेळावे व मोफत शस्त्रक्रिया याचे लाभ घेण्याबाबत मार्गदर्शन केले. सदर आरोग्य मेळाव्यात उपस्थित वयोवृद्ध नागरिक यांचे बीपी, शुगर चेक केले व नागरिकांची तपासणी करून आवश्यकते नुसार गोळ्या, औषधाचे वाटप करण्यात आले. सदर आरोग्य मेळाव्या करीता पोस्टे हद्दीतील शाळेतील विद्यार्थी, महिला, पुरुष, 200 ते 250 च्या संख्येने उपस्थित होते.   नागरिकांनी जिल्हा पोलीस दल व सीआरपीएफ जवान यांचे आभार मानले. तसेच उपस्थित सर्व नागरिकांना स्नेहभोजन देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. सदर आरोग्य मेळावा यशस्वी होण्याकरिता उप पोस्टेतील जिल्हा पोलिस, SRPF आणि CRPF चे सर्व अधिकारी/अंमलदार, जवान यांनी मोलाचे योगदान दिले व सदर आरोग्य मेळाव्यात कोणताही अनुचित प्रकार घडू न देता शांततेत पार पडला.