किशोरवयीन मुलींची मार्गदर्शक कार्यशाळा

56

छल्लेवाडा :-अहेरी तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा छल्लेवाडा, ग्रामपंचायत रेपनपल्ली, आणि कैवल्य फाउंडेशन  यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवशीय किशोरवयीन मुलींसाठी कार्यशाळेचे आयोजन आज दि.२१/१२/२०२२रोज बुधवारला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा छल्लेवाडा येथे करण्यात आले.यावेळेस मासिक पाळी आणि चांगला-वाईट स्पर्श या विषयांवर मुलींना सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
 या कार्यशाळेत मार्गदर्शक म्हणून मनिषा कांचनवार तालुका कोआर्डीनेटर अहेरी यांनी चांगला व वाईट स्पर्श तसेच मासिक पाळी याविषयी कृती युक्त मार्गदर्शन केले. कल्पना रागिवार यांनी किशोरवयीन मुलींच्या मासिक पाळी व इतर समस्या जाणुन घेऊन त्यांना मार्गदर्शन केले, तसेच शालेय विद्यार्थीनींनी नृत्य सादर केले. व्हिडिओ द्वारे खुली चर्चा घेण्यात आली. कार्यक्रमाचे  उद्घाटन देशातील कर्तृत्ववान महिलांच्या प्रतिमा पुजनाने झाली. पाहुण्यांचे स्वागत झाल्यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्ष कल्पना रागिवार मुख्याध्यापिका यांनी मनोगत व्यक्त केले. तर उद्घाटन लक्ष्मी मडावी सरपंच रेपनपल्ली, प्रमुख पाहुणे हेमंत सभावट शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, डॉ.पल्लवी ईटनकर, सुनील आईंचवार केंद्रप्रमुख,राज वळवी (प्रोग्राम लिडर, कैवल्य फाउंडेशन) मनिषा कांचनवार, बुज्जीताई तोर्रेम ग्रा.पं.सदस्या, सरस्वती धायगुडे (गांधी फेलो, कैवल्य फाउंडेशन), किर्ती गेडाम, अजय पस्पुनुरवार, लोमेश सिडाम ग्रामसेवक हे होते. त्याचप्रमाणे अंगणवाडी सेविका, गावातील महिला पालक व भगवंतराव हायस्कूल कमलापुर येथील विद्यार्थीनी, 110 शालेय विद्यार्थीनी, किशोरवयीन मुली व माता पालक उपस्थित होत्या तसेच ग्रामपंचायत कडून किशोरवयीन मुलींना सॅनिटरी नॅपकिन्स वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरजलाल येलमुले प्राथमिक शिक्षक यांनी केले. तर आभारप्रदर्शन सरस्वती धायगुडे (गांधी फेलो) यांनी केले.