जुलै-अगस्ट २०२२ मध्ये आलेल्या महापूर व अतिवृष्टीमुळे वाहून गेलेल्या घरे आणि जनावरांचे पैसे महिन्यात मिळणार

43

*आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या प्रयत्नांना यश*

*सिरोंचा:-* महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री तथा आमदार अहेरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय नेते विकासाचे केंद्रबिंदू राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ट नेते मा.धर्मरावबाबा आत्राम  यांचा दिनांक ४/१/२०२३ ला दौरा दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते अधिक संख्येने उपस्थित होते.त्यावेळी आमदार म्हणाले की जुलै-अगस्ट महिन्यात आलेल्या महापुरामुळे सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांचे व शेतमजूरांचे असे अनेक लोकांचे जनावरें वाहून गेले आहेत त्यांचा अधिकाधिक नुकसान झाले आहे त्या करिता यंदा झालेल्या नागपूर अधिवेशनात संबंधित मंत्री सोबत चर्चा व पाठपुरावा केली असता याविषयीवर गंभीर दखल घेत त्या वाहून गेलेल्या जनावरांचे आर्थिक नुकसान निधी या महिन्याच्या अखेर किंवा पुढील महिन्या पर्यंत देण्याचा निर्णय शासनाने घेतली आहे अशी माहिती विद्यमान आमदार अहेरी विधानसभा मतदारसंघाचे नेते धर्मरावबाबा आत्राम. दिली आहे.
   यावेळी आमदार. सिरोंचा तालुका दौरा दरम्यान उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते होते.