प.दि.जैन कला महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती उत्सवात साजरी

46

वाशीम :- स्थानिक श्री. प. दि. जैन कला महाविद्यालय अनसिंग येथे  इतिहास विभाग व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले यांच्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 
      या कार्यक्रमाच्या प्रसंगी बोलत असताना प्रा. डॉ.  संतोष इंगोले यांनी मध्ययुगीन काळात भारतातील सर्वसामान्य लोकांना शिक्षणाचा अधिकार नव्हता अशावेळी केलेले कार्य अनमोल आहे. आज शिक्षणाशिवाय  तरणोपाय हे सिद्ध झाले आहे. सावित्रीबाई फुले या फक्त शिक्षण तज्ञ नव्हत्या तर थोर समाज सुधारकही होत्या. भारतातील स्त्री शिक्षणाच्या खऱ्या उद्धारक सावित्रीबाई फुले होत्या. त्यांच्या कष्टामुळे आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने काम करीत आहेत याचे सर्व श्रेय सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांना जाते असे विचार आपल्या प्रमुख मार्गदर्शकाच्या भाषणांमधून व्यक्त केले या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ  विवेक गुल्हाने होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणांमधून सावित्रीबाई फुले यांनी भारतीय समाजाला शिक्षणासाठी खऱ्या अर्थाने जागृत केले असे म्हटले पूर्वी चूल आणि मूल एवढीच स्त्रियांची जबाबदारी होती. परंतु आज भारतीय स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने काम करीत आहेत याचे सर्व श्रेय सावित्रीबाई फुले यांना जाते असे विचार प्राचार्य डॉ  विवेक गुल्हाने यांनी व्यक्त केले आहे. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. अनिल शिंदे सर उपस्थित होते त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.  या कार्यक्रमाच्या प्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु. सानिका गणेश वारे व कु. मंदा नारायण राऊत यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याविषयी माहिती दिली. या कार्यक्रमाच्या  प्रास्ताविकांमधून कार्यक्रमाच्या आयोजनाचा उद्देश राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी तसेच इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. सचितानंद बिचेवार यांनी सांगितला या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी त्याचबरोबर विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु.  दिपाली नारायण मानवतकर ने केले तर आभार कु. कोमल शेळके या विद्यार्थिनीने मानले कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.