माजी आ. डॉ नामदेवराव उसेंडी यांनी घेतले बाबलाई देवीचे दर्शन

53

*परिसरातील कोरीव मूर्त्याचे संवर्धन करावे*

भामरागड: तालुक्यातील बेजूर या गावाला लागून असलेल्या बेजूर कोंगा पहाडीच्या पायथ्याशी बाबलाई मातेचे मंदिर आहे. येथे दरवर्षी आदिवासी व गैरआदिवासी बांधव मोठ्या उत्साहाने जत्रेचे आयोजन करून आपल्या मातीशी व संस्कृतीशी असलेले नाते पिढ्यान पिढ्या जपत आहेत. दिनांक १ जानेवारी ते ३ जानेवारी २०२३ पर्यंत बाबलाई माता वार्षिक पूजा व सांस्कृतिक संमेलनाचे आयोजन भामरागड पट्टी पारंपरिक गोटूल समितीच्या वतीने करण्यात आले.
माता बबलाई ही आदिवासी लोकांची प्रमुख देवता आहे. शेकडो वर्षापासून परिसरातील लोक इथे पारंपारिकरित्या एकत्र येतात. क्षेत्रात जानेवारी महिन्यात धान कापनी संपलेली असते. आणि नवीन धान खायला सुरुवात व्ह्यायची असते. आदिवासी समुदायामध्ये कोणताही नवीन वस्तु खाण्यापूर्वी किंवा कामाला सुरुवात करण्यापूर्वी पंडुम म्हणजे पूजा केली जाते. धान हा इथला महत्वाचा पीक आहे. म्हणून लोक नवीन धान खायला सुरुवात करण्यापूर्वी पिंडी पंडुम करतात. या निमित्ताने क्षेत्रातील आदिवासी व गैर आदिवासी एकत्र येतात व बाबलाई मातेची पूजा करतात. आदिवासी बहुल असलेल्या आपल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये आदिवासी क्षेत्राची स्वतःची सांस्कृतिक रचना आहे. आदिवासी सोबतच वास्तव्यास असलेले गैर आदिवासी सुमुदाय सुद्धा या सांस्कृतिक व्यवस्थेचा भाग आहे. आदिवासी व गैरआदिवासी समाज आपल्या जल जंगल जमिनीला व निसर्गातिल विविध बाबींना आपले दैवत मानत असतात. याबरोबरच क्षेत्रातील आदिवासी जनता आपली भाषा, संस्कृती, प्रथा परंपरा व रीतिरिवाज जीवंत ठेवण्यासाठी भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करतात. आदिवासी आणि निसर्ग याचा अतिशय जवळचा संबंध आहे. आदिवासी निसर्गाची पूजा करतो, कारण निसर्गाशिवाय, जल, जंगल, जमीनीशिवाय आदिवासीच क़ाय कोताही सामाज जीवंत राहू शकत नाही. म्हणूनच संस्कृतीला जतन करणे व बाबलाई परिसरातील कोरीव मूर्त्याचे संवर्धन करावे. असे माजी आमदार तथा अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेस डॉ नामदेवराव उसेंडी यांनी केले. भामरागड पट्टीतील अनेक ग्रामसभांनी सहभाग घेतला होते. यावेळी देवाजी तोफा, माजी नगराध्यक्ष भामरागड राजू वड्डे  आदिवासी, ऍंड. लालसू नागोटी, चिंना महाका, विनायक वाडीवा, डीएपो रितेश देवगडे, आरफओ शेरेकर, संजय मडावी, विजय शेडमाके, सुरेश पुंगाटी, राजेश्वरी लेखामी, दत्ता करंगामी, पंकज खोबे  आदी बहुसंख्येने बांधव उपस्थित होते