वेलगूर..तालुक्यातील वेलगुर येथे न्यूस्टार युवा मंडळाकडून आयोजित खुले व्हॉलीबॉल सामन्याचे आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष व माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते पार पडला.
या व्हॉलीबॉल सामन्याचे उदघाटन समारंभाला अध्यक्ष म्हणून आविसचे युवा नेते व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडलवार तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपसभापती गीताताई चालूरकर, सरपंच किशोर आत्राम,उपसरपंच उमेशभाऊ मोहूर्ले,माजी सरपंच लालू करपेत,ग्राम पंचायत सदस्य रोहित गलबले,अरविंद कन्नाके,मनीष दुर्गे,सेवानिवृत्त वनपाल जयंत गजभिये, वनरक्षक तेजनकर, ग्रामसेवक बाटवे,डॉ.गलबले,कवडुजी चल्लावार, साईनाथ नागोसे,शरद गजभिये,यशोधन गजभिये,विनोद कावेरी,माजी सरपंच गुलाब सोयाम,प्रवीण रेषे आदी उपस्थित होते.
यावेळी माजी आमदार दिपक दादा आत्राम व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी व्हॉलीबॉल या खेळाविषयी उपस्थित खेळाडू व नागरिकांना बहुमूल्य मार्गदर्शन केले.
या व्हॉलीबॉल सामन्यासाठी प्रथम पुरस्कार माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडलवार तर द्वितीय पुरस्कार माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्याकडून आणि तृतीय पुरस्कार वनरक्षक तेजनकर यांच्याकडून ठेवण्यात आले.या व्हॉलीबॉल सामन्याचे उदघाटन समारंभ मोठ्या थाटात पार पडला. सामन्याचे यशस्वी आयोजनासाठी क्रीडा मंडळाचे कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.