*काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती*
देशात सद्या स्थितीत कन्याकुमारी पासुन ते काश्मिर पर्यंत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात भारत जोडो याञा सुरु असुन याञेला देशभरातुन उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.माञ पक्षाची नाळ सर्व सामान्यापासुन तुटु नये व पक्षाची विचारधारा घराघरात पोहचवण्यासाठी त्याच धर्तीवर जिल्ह्यात हात से हात जोडो अभियान राबविण्यात येणार आहे.त्या अनुषंगाने गडचिरोली येथील काञटवार सभागृहात वरिष्ठ नेते तथा माजी खासदार मारोतराव कोवासे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पाडण्यात आली.
या आढावा बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून गडचिरोली जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे,माजी आमदार डाॅ.नामदेव उसेंडी,काँग्रेस कमिटीचे प्रदेश सचिव डाॅ. नामदेव किरसान,प्रदेश सचिव नितीन कोडवते,महिला प्रदेश सचिव डाॅ.चंदा कोडवते, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष पांडुरंग घोटेकर,देवजी सोतक्के,सहकार सेल जिल्हाध्यक्ष दामदेव मंडलवार, महिला प्रदेश सचिव भावना वानखेडे,माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पोरेटी,जेष्ठ नेते परसराम टिकले शहर अध्यक्ष सतीश विधाते, वसंत राउत,अब्दुल पजेवानी,राजेश ठाकुर, दमयंती निजाम पेंडाम, सुवर्णा येमुलवार,रजनी अतराम,आरमोरी तालुका अध्यक्ष मिलींद खोब्रागडे,कुरखेडा तालुका अध्यक्ष जीवन नाट, कोरची तालुका अध्यक्ष मनोज अग्रवाल,देसाईगंज तालुका अध्यक्ष राजेंद्र बुल्ले,उपाध्यक्ष नितीन राऊत,चामोर्शी तालुका अध्यक्ष प्रमोद भगत, एटापली तालुका अध्यक्ष रमेश गफावर, परसराम पदा, पपू हकीम,प्रमोद गूत्तेवार,सतीश जवाजी,जिल्हा सचिव सुनिल चडगुलवार, अनुसूचित जाती जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, वृंदा गजबिये दिलीप घोड़ाम,केसरी पाटिल उसेंडी देसाईगंज युवक काँग्रेस अध्यक्ष पिंकु बावणे,मनोज ढोरे,अर्पणा खेवले,आशा मेश्राम, सुनीता रायपुरे,लता मुरकुटे,वर्षा कुलदेवकर, कल्पना नंदेश्वर,पौर्णिमा भडके,आरती लहरी,कविता भगत,रोशणी बैस,रजनी आञाम,मिलींद बारसागडे ,राजेश ठाकरे,काशीनाथ भड़के, दत्तू सोमनकर,प्रशांत कोराम,घनश्याम मुरवतकर,नरेंद्र गजपुरे , विश्यवेश्वरा दरों, रमेश कोडाप,मनोरंजन हलदर,राकेश रत्नावर, धिवरू मेश्राम, रामभाउ ननावारे,श्रीकांत काटवते, श्रीनिवास तटपलीवार,आदी पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
केंद्रात सद्या स्थितीत भाजपाचे सरकार असुन केन्द्र सरकारच्या चुकिच्या धोरणामुळे देशात प्रचंड बेरोजगारी,महागाई वाढली आहे.जाती धर्माचे विष पेरल्या जात असल्याने देशात अराजकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.देशाची अखंडता,एकात्मता टिकून राहावी, शेतकऱ्यांना, बेरोजगारांना योग्य न्याय मिळावा,यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात देशात पैदल भारत जोडो याञा सुरु असुन आतापर्यंत ३ हजार किलोमीटरचा टप्पा पार करण्यात आला आहे.
दरम्यान देशातील हजारो कामगार,शेतकरी,कष्टकरी,
वृद्ध,बालगोपाल यांनी याञेत राहुल गांधी यांना प्रत्यक्ष भेटून आपल्या समस्या अवगत करुन दिल्या.त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील समस्या जाणुन घेण्यासाठी व काँग्रेसची विचारधारा घराघरापर्यंत पोहचवण्यासाठी पक्षाच्या वतीने सर्व कार्यकर्त्यांना गावपातळी, तालुका व जिल्हा पातळीवर सदर मोहिम राबविण्या बाबत जिल्हा अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी मार्गदर्शन केले.तसेच शेतकरी,कष्टकरी, व्यापारी,कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाबाबत जाती पातीच्या राजकारणाला बगल देत सर्वांना एकोप्यात जोडण्यासाठी व जागृती करण्यासाठी पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार हात से हात जोडो अभियान राबविणे गरजेचे असल्याची माहिती ब्राम्हणवाडे यांनी उपस्थितांना दिली.